शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 22:41 IST

एक विवाहित महिला दादर पोलिसांकडे जाते. तिघा जणांनी अपहरण केल्याची तक्रार देते. हा गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे येतो.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 - एक विवाहित महिला दादर पोलिसांकडे जाते. तिघा जणांनी अपहरण केल्याची तक्रार देते. हा गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे येतो. वानवडी पोलीस गांभिर्याने तपास करतात. महिलेच्या बोलण्यावर पोलिसांना संशय येतो. कसून केलेल्या तपासाअंती निष्पन्न होतो बनाव. घरामध्ये करमत नसल्यामुळे स्वत:च मुंबईची वाट धरलेल्या महिलेचा खोटारडेपणा अखेर उघड होतो.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मुळची मुंबईची आहे. तिचे बालपण व शिक्षण सर्व मुंबईत झालेले आहे. तिचे चार महिन्यांपूर्वी महंमदवाडी परिसरातील एका तरुणाशी लग्न झाले. तिचा पती चालक आहे. लग्नानंतर ही महिला पुण्यातील वानवडी परिसरात राहण्यास आली. परंतु तिचे मन पुण्यामध्ये रमत नव्हते. सतत मुंबईला जायची इच्छा तिला होत होती. एक दिवस तिने सासुच्या पर्समधून गुपचुप पैसे घेतले. एक दिवस ती सासरच्यांना न सांगताच पुणे स्टेशनवरुन रेल्वेने मुंबईला निघून गेली. त्यानंतर मात्र, पती आणि वडिलांना काय सांगावे असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे तिने अपहरणाची कथा रचली. भाजी खरेदी करण्यासाठी गेलेली असताना मोटारीमधून आलेल्या तिघाजणांनी गुंगीचे औषध देऊन आपले अपहरण केल्याचे सांगतानाच जेव्हा आपल्याला शुद्ध आली तेव्हा दादर येथे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मोटारीतील तिघांना हिसका देऊन सुटका करुन घेत पोलिसांकडे मदत मागितल्याचे तिने सांगितले होते. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत दादर पोलिसांनी विनयभंगासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ही घटना वानवडीमध्ये घडलेली असल्यामुळे पुणे पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. या महिलेकडे चौकशी करताना अपहरण झालेल्या ठिकाणाची माहिती पोलिसांनी मिळवली. तिने सांगितलेल्या अपहरणाच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यामध्ये अशी कोणतीही घटना घडल्याचे दिसत नव्हते. तिच्याकडे सखोल चौकशी करुन सत्य वदवून घेण्यात पोलीस यशस्वी झाले. शेवटी पोलिसांच्या प्रश्नांच्या मा-यासमोर टिकाव धरु न शकलेल्या या महिलेने अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली. तिच्यावर याप्रकरणी कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली.