शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

बलात्काराची केस मागे घेण्यासाठी विवाहितेवर पुन्हा अत्याचार

By admin | Updated: April 26, 2017 22:06 IST

वर्षभरापूर्वी नोंदविलेली बलात्काराची तक्रार मागे घ्यावी, यासाठी विवाहितेला पळवून नेऊन

 ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 26 -  वर्षभरापूर्वी नोंदविलेली बलात्काराची तक्रार मागे घ्यावी, यासाठी विवाहितेला पळवून नेऊन दोन महिने घरात डांबून ठेवलेल्या पीडितेची पोलिसांनी सुटका केली. या दोन महिन्यांच्या कालावधीत आरोपीने सतत अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे नोंदविली. ही घटना मुकुंदवाडी रेल्वेपटरी परिसरातील संतोषीमातानगर येथे बुधवारी दुपारी घडली.प्रकाश नरवडे (३०,रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलीस आणि पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, आरोपीने वर्षभरापूर्वी पीडितेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध १६ एप्रिल २०१६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. हा खटला सुनावणीसाठी आल्याने आरोपीच्या पायाखालची वाळू घसरली. ही केस मागे घ्यावी, यासाठी तो साम, दाम, दंड, भेदाचा वापर करीत आहेत. पीडितेच्या मानलेल्या भावाच्या मदतीने २६ फेब्रुवारी रोजी त्याने तिला गाठले. बलात्काराची केस मागे घेण्याची धमकी त्याने दिली. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने बळजबरीने रिक्षात कोंबून तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने तिला घरात डांबून ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत तो तिचे दोन मुले, पती आणि अन्य नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करीत होता. आरोपीनेच पीडितेला डांबून ठेवल्याचे तिच्या नातेवाईकांना कळल्याने ते तक्रार देण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्यात गेले असता पोलिसांनी ठाण्याच्या प्रवेशद्वारातूनच त्यांना हाकलून दिल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला. त्यानंतर पोलीस आयुक्त आणि लोकशाही दिनातही त्यांनी तक्रार अर्ज दिले होते.एसीपी बाखरेंच्या आदेशाने पोलिसांनी मारली धाडएका विवाहितेला घरात डांबून ठेवून दोन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते भानुदास कीर्तिशाही, सर्जेराव मगरे, सुंदर साळवे यांनी सहायक पोलीस आयुक्त माणिक बाखरे यांना कळविले. बाखरे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण आणि कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या घरावर छापा मारून पीडितेची सुटका केली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. बलात्कार, डांबून ठेवण्याचा नोंदविला गुन्हा पीडितेने बुधवारी दुपारी आरोपी प्रकाशविरुद्ध बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पो. नि. मुदिराज यांनी दिली.