शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठांचे शटर डाउन

By admin | Updated: June 6, 2017 01:33 IST

शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागासह, ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागासह, ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. तेराही तालुक्यात हा बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांच्या हाकेला व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.आजही शेतकऱ्यांनी काही ठिकाणी शेतीमाल रस्त्यावर फेकून दिला. मात्र हे प्रमाण कमी होते. दूधसंकलन बंद ठेवले. काही ठिकाणी दुधाचे टँकर अडवून ठेवले, मात्र त्याचे नुकसान केले नाही. रविवारी सर्वच तालुक्यांत शेतकऱ्यांनी बंदची हाक दिली होती. त्यामुळे आज दूध संकलनासह बाजारातील किरकोळ दुकानांचे शटर व्यापाऱ्यांनी उघडलेच नाही. काही ठिकाणी दुकाने उघडली गेली. मात्र शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर ती बंद करण्यात आली. विशेष म्हणजे काही ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी एक दिवस आमचे नुकसान झाले तरी चालेल. पण ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर आमचा धंदा सुरू आहे, त्यांच्यासाठी एक दिवस असे म्हणत ते बंदमध्ये सहभागी झाले. सोमवारीही काही ठिकाणचे आठवडेबाजार होते, मात्र तेही आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. गावोगावी शेतकऱ्यांनी जमून रास्ता रोको केले. शेतकऱ्यांना हव्या असलेल्या मागण्यांच्या घोषणा दिल्या, तसेच या सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला़ याला अपवाद फक्त भोर शहर ठरले. येथील शटर मात्र आज उघडेच होते. दिवसभर सर्व व्यवहार नियमीत सुरू होते.बारामती, इंदापूर तालुक्यात सर्वच बाजारपेठा बंद होत्या. जेजुरी येथील मुख्य चौकात रास्ता रोको आणि मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करीत सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला. शहरातील सर्व दुकाने-उपाहारगृहे बंद असल्यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मात्र हाल झाले.दौैंड शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळला. विशेष म्हणजे येथील कुरकुंभ औद्योगिकनगरीतदेखील व्यावसायिकांनी बंद पाळला.