शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये बाजार समित्यांची कॅशलेसकडे वाटचाल

By admin | Updated: January 16, 2017 18:26 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समितींच्या सर्व व्यवहारात कॅशलेस पद्धती आणण्यासाठी जिल्हाधिकारी व उपनिबंधक कार्यालयाने सुरू केलेल्या प्रयत्नांना आता अंतिम स्वरूप

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 16 - कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समितींच्या सर्व व्यवहारात कॅशलेस पद्धती आणण्यासाठी जिल्हाधिकारी व उपनिबंधक कार्यालयाने सुरू केलेल्या प्रयत्नांना आता अंतिम स्वरूप येत आहे. ह्यआरटीजीएसह्णने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीनंतर प्रत्येक व्यवहार कॅशलेस पद्धतीने करण्याचे प्रयत्न शासनातर्फे सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार ह्यकॅशलेसह्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी बाजार समिती प्रशासन व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वाटचाल सुरू केली आहे. स्वाईप मशिनद्वारे तसेच आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात शेतमालाची रक्कम जमा करण्याची सूचना द्विवेदी यांनी केली. धनादेशद्वारे रक्कम देण्यात काही अडथळे येतात. त्यामुळे स्वाईप मशिन किंवा आरटीजीएस पद्धतीने तत्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या सूचनेची अंमलबजावणी म्हणून आरटीजीएस पद्धतीने शेतमालाची रक्कम देण्याला व्यापाऱ्यांनी संमती दर्शविली आहे. बँक खाते क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते उघडण्यासाठीदेखील बाजार समिती व व्यापाऱ्यांनी प्रयत्न करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या. शेतकऱ्यांनीदेखील बँक खाते उघडून कॅशलेस व्यवहाराला चालना द्यावी, असे आवाहन राहुल द्विवेदी यांनी केले.