शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

By admin | Updated: July 13, 2017 00:57 IST

६३ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा गेल्या १२ वर्षांचा भविष्यनिर्वाह निधीच (पीएफ) बाजार समितीने भरला नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीधील ६३ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा गेल्या १२ वर्षांचा भविष्यनिर्वाह निधीच (पीएफ) बाजार समितीने भरला नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा ‘भविष्यातील निर्वाह’ अंधारात असल्याचे बोलले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८३ रोजंदारी कर्मचारी आहेत. यांपैकी सुमारे ६३ कर्मचारी १९९७ पासून कामावर रुजू झाले असून, २००९पासून त्यात १२० कर्मचाऱ्यांची वाढ झाली. मात्र, कामावर रुजू झाल्यापासून एकाही रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पीएफ बाजार समितीकडून कपात केला जात नव्हता. राज्य सरकारने कामावर रुजू झाल्यापासून ज्या कर्मचाऱ्यांना पीएफ मिळाला नाही, अशा कर्मचाऱ्यांसाठी अमेन्स्टी योजना लागू केली. या योजनेअंतर्गत २००९ ते २०१६ पर्यंतचा पीएफ देण्याची तरतूद आहे. त्यानुसार बाजार समितीने रोजंदारी कर्मचाऱ्यांना २००९ ते डिसेंबर २०१६ पर्यंतच्या पीएफची रक्कम पीएफ कार्यालयाकडे जमा केली. यातील जुन्या ६३ कर्मचाऱ्यांना त्याचा कोणताही फायदा देण्यात आलेला नाही. याबाबत बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे म्हणाले, ‘‘कामावर रुजू झाल्यापासून कपात न केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना पीएफ शासनाच्या अमेन्स्टी योजनेअंतर्गत पीएफ कार्यालयाकडे जमा केला आहे. कायदेशीर बाबी तपासून १९९७ पासूनच्या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण पीएफ देण्यासाठी प्रयत्न करू. मागील सहा महिन्यांपासूनचा पीएफ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापण्यात आला आहे. त्याबरोबर रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.>...अन्यथा न्यायालयात धाव घेणारसंपूर्ण पीएफ मिळावा, यासाठी पीएफ कार्यालय आणि कामगार आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केला आहे. बारा वर्षांचा पीएफ जमा न केल्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. बाजार समितीने आमच्यावर अन्याय करू नये. समितीने राहिलेला पीएफ लवकरात लवकर जमा करावा; अन्यथा त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा विचार असल्याचे एका रोजंदारी कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.