शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीबाहेरील सावकारी कर्जाला माफी नाही!

By admin | Updated: January 15, 2016 01:07 IST

एखाद्या सावकाराने आपल्या हद्दीबाहेरील शेतकऱ्याला कर्ज दिले असेल तर ते माफ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापर्यंत नेणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने आता या मुद्द्यावर यू टर्न घेत

मुंबई : एखाद्या सावकाराने आपल्या हद्दीबाहेरील शेतकऱ्याला कर्ज दिले असेल तर ते माफ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापर्यंत नेणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने आता या मुद्द्यावर यू टर्न घेत अशी कर्जमाफी न देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत आज माहिती दिली. सावकारांनी कोणत्या क्षेत्रात कर्जवाटप करायचे याची हद्द त्यांच्या परवान्यामध्येच ठरवून दिलेले असते. मात्र, राज्यातील अनेक सावकारांनी आपल्या हद्दीबाहेर कर्जवाटप केलेले आहे. अशा सुमारे १ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळत नव्हता. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात हद्दीबाहेरील कर्जही माफ करण्याची भूमिका घेण्यात आली व तसा प्रस्तावही मंत्रिमंडळाच्या विचारार्थ आला होता. मात्र, सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले की, अशी कर्जमाफी देण्याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखविला होता. मात्र, अशी कर्जमाफी देणे अनधिकृत असून आॅडिटमध्ये त्यावर आक्षेप येऊ शकतात आणि त्यामुळे सरकारपुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हद्दीबाहेरील सावकारी कर्ज माफ केले जाणार नाही, असे पाटील यांनी आज स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)कर्जमाफीला मुदतवाढ!विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दिलेल्या सावकारी कर्जमाफीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लवकरच याबाबतचा आदेश काढण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अनुसूचीमधून फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा वगळण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. सर्व संबंधितांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच याबाबत उचित निर्णय घेण्यात येईल, असे पाटील यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.चेंडू रिझर्व्ह बँकेच्या कोर्टात ज्या बँकेवर घोटाळ्यांमुळे प्रशासक नेमलेला असेल त्या बँकेच्या संचालकांना संबंधित बँकेसह इतर कोणत्याही सहकारी बँकेत १० वर्षांपर्यंत संचालक होता येणार नाही हा निर्णय राजकीय सूडबुद्धीतून नव्हे, तर रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे, असा खुलासा पाटील यांनी केला.