शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ला ३१ मार्च ‘डेडलाइन’

By admin | Updated: January 21, 2016 03:45 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करुन गेल्या वर्षीप्रमाणेच योजनेच्या कामांमध्ये गती राखून निधीचा पूर्णपणे विनियोग करावा.

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करुन गेल्या वर्षीप्रमाणेच योजनेच्या कामांमध्ये गती राखून निधीचा पूर्णपणे विनियोग करावा. योजनेच्या माध्यमातून गावे वॉटर न्युट्रल होण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिका-यांनी ठेवावे, यात कुठलीही हयगय करू नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.राज्यातील टंचाई परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षी उपक्रम असून ३१ मार्चपुर्वी पहिल्या टप्प्यातील सर्व गावांतील कामे पूर्ण करावीत. दुस-या टप्प्यातील गावांचे काम देखील विहित कालमर्यादेत पूर्ण करावे. या योजनेसाठी दिलेल्या निधीचा पूर्ण विनियोग होईल यावर लक्ष केंद्रित करुन जलयुक्त शिवार योजनेमध्ये सहभागी गावे ’वॉटर न्युट्रल’ करण्याचे उद्दिष्ट सर्व जिल्ह्यांनी पूर्ण करावे. राज्य शासनाने ’मागेल त्याला शेततळे’ ही योजना जाहीर केली आहे. त्यासाठी कुठलीही अट न ठेवता शेतक-यांना शेततळ्याची कामे मंजूर करावीत. राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची उपस्थिती कमी आहे. त्यासाठी राज्यात जॉबकार्ड देण्यासाठी विशेष मोहिम सुरु करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.