शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत १४ मार्चला ‘बहुजन मोर्चा’

By admin | Updated: January 19, 2017 06:01 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, या मागणीसाठी राज्यातील दलित, आदिवासी, मुस्लीम, भटके आणि विमुक्तांचा राज्यव्यापी मोर्चा १४ मार्चला मुंबईत धडकणार आहे.

मुंबई : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, या मागणीसाठी राज्यातील दलित, आदिवासी, मुस्लीम, भटके आणि विमुक्तांचा राज्यव्यापी मोर्चा १४ मार्चला मुंबईत धडकणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सामील होणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे आनंदरराज आंबेडकर यांनी दिली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आंबेडकर म्हणाले की, ‘बहुजन हक्क संवर्धन विराट मोर्चा’ या नावाखाली सर्व दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्त आणि अल्पसंख्याक या मोर्चात सामील होणार आहेत. संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय आणि हक्कांचे संवर्धन व्हावे, हा एकमेव हेतू त्यात आहे. मराठा क्रांती मूकमोर्चामुळे राज्यातील या बहुजनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे या मोर्चातून बहुजनांना सरकारने दिलासा देण्याची मागणी करण्यात येणार आहे. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, मुळात मराठा समाजाविरोधात किंवा मराठा आरक्षणाविरोधात हा मोर्चा नसेल. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने इतर मागासवर्गीय जातीच्या आरक्षणाला हात लावू नये, अशी सरळ मागणी मोर्चातून केली जाईल. कोणत्या मार्गाने आणि किती वाजता मोर्चा निघेल, याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल. मात्र, संपूर्ण मोर्चा मूक स्वरूपाचा असून कोणताही कार्यकर्ता यामध्ये घोषणा देणार नाही. (प्रतिनिधी)>मोर्चात सामील होणारे मान्यवर!केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई गिरकर, रिपाइंचे अविनाश महातेकर, नानासाहेब इंदिसे, अर्जुन डांगळे, आमदार हरिभाऊ राठोड, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे आणि उपमहापौर अविनाश लाड, माजी आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, अखिल भारतीय मातंग संघाच्या कुसुमताई गायकवाड, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, असे विविध समाजाचे, पक्षांचे आणि संघटनांचे प्रतिनिधित्त्व करणारे नेते या वेळी सामील होणार आहेत.