शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

चिपळूण शहर : हरी मुद्राळे यांचे देहदान; मृतदेह कृष्णा हॉस्पिटलाला सुपूर्द

चिपळूण : ‘मरावे परी कीर्तीरुपे उरावे’ या उक्तीप्रमाणे शिक्षकीपेशातून निवृत्त झालेल्या शहरातील पेठमाप येथील हरी कृष्णा मुद्राळे (८६) यांनी मरणोत्तर देहदान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांचा मृतदेह गुरुवारी कृष्णा हॉस्पिटल, कऱ्हाड येथे सुपूर्द करण्यात आला आहे. शिक्षक म्हणून सेवेत असणाऱ्या हरी मुद्राळे यांनी संस्कारमय पिढी घडवण्याचे काम केले. धार्मिक व सामाजिक कार्यात ते हिरीरीने भाग घेत असत. सर्वधर्मसमभावाचे ते एक प्रतीक होते. भजनाच्या कार्यक्रमातही ते गायन करीत असत. संस्कारक्षम पिढी घडवताना इतरांना नवा आदर्श घालून देण्याचे कामही त्यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी देहदानातून समाजाला चांगल्या संस्काराचा धडा दिला आहे.मुद्राळे यांना बुधवारी अस्वस्थ वाटू लागले म्हणून त्यांना येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. मुद्राळे (गुरुजी) यांनी आपल्या मित्र परिवाराशी मरणानंतर देहदान करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांनी कोणतेही कारण पुढे न करता त्यांच्या संकल्पनेला मान्यता देऊन कृष्णा हॉस्पिटल, कऱ्हाड येथे संपर्क साधला.त्यासाठी साईनाथ कपडेकर, व्यावसायिक जयंत आंबुर्ले यांच्या मदतीने मुद्राळे यांचा मृतदेह कृष्णा हॉस्पिटलच्या ताब्यात देण्यात आला. मरणानंतर कोणतेही धार्मिक विधी करायचे नाहीत, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार विधी केले जाणार नाहीत. मुद्राळे हे एक कुशल मार्गदर्शक तसेच श्री सिध्दिविनायक मंदिर, श्री देव सोमेश्वर, श्री देवी करंजेश्वरीचे ट्रस्टी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (वार्ताहर) शिक्षकीपेशात ज्ञानार्जन करणाऱ्या मुद्राळेंनी ठेवला समाजासमोर एक आदर्श. निधनानंतर कोणताही धार्मिक विधी न करण्याचा संकल्प. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दिला मृतदेह.