शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: July 28, 2016 01:03 IST

जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे

औरंगाबाद : जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे १७ दिवसांनंतरही सुरूच आहेत. पालखेड धरणाच्या कालव्यातूनही तब्बल १० दिवस मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पांच्या कालव्यातून सुमारे दोन टीएमसी पाणी पळविण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.गोदावरी खोऱ्यात नगर, नाशिक जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमधील पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाच्या तत्त्वानुसार खाली जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी येणे अपेक्षित होते, परंतु त्याऐवजी कालव्यांद्वारे हे पाणी वळविण्यात आले. सुरुवातीला नांदूर-मधमेश्वर आणि पालखेड धरणाचे कालवे सुरू करण्यात आले. त्यातील नांदूर- मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे १७ दिवसांनंतरही सुरूच आहेत. नांदूर- मधमेश्वरच्या कालव्यातून श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांत हे पाणी वळविले गेले आहे. पालखेड प्रकल्पाचा कालवाही १० दिवस सुरू होता. मात्र, हे पाणी वळविले जात असताना, जलसंपदा विभाग किंवा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्याही नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून १०० क्युसेक्सआणि उजव्या कालव्यातून १५० क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. दोन्ही प्रकल्पांच्या कालव्यांमधून आतापर्यंत सुमारे २ टीएमसीपेक्षा जास्त पाणी वळविले गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)जायकवाडी मृतसाठ्यातचवरच्या भागातून पाणी न आल्यामुळे जायकवाडी धरण अजूनही रिकामेच आहे. हे धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ३७ दलघमी पाण्याची गरज आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून सध्या धरणात १,६१४ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.म्हणे आरक्षणानुसार पाणी !गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी वरच्या भागात कालव्याद्वारे वापरले गेलेले पाणी समन्यायी पाणीवाटपाचा निर्णय घेताना विचारात घेतले जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘वरच्या भागात जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्यासाठी म्हणून पाण्याची मागणी नोंदविलेली आहे. त्यांच्या आरक्षणाप्रमाणे पाणी दिले जात आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १५ आॅक्टोबर रोजी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटप केले जाईल. त्यामुळे कालव्यांद्वारे वापरलेले पाणी हिशोबात धरण्यात येईल. कालव्यांतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात येत आहे.’ वरच्या धरणांमध्ये ५२ टक्के साठाजायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमधील सरासरी जलसाठा पन्नास टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. भंडारदरा धरण ५८% भरले असून, गंगापूर धरण ७५ टक्के, नांदूर-मधमेश्वर बंधारा ८५ % आणि भावली प्रकल्प ९९ टक्के भरला आहे. सद्य:स्थितीत वरच्या भागातील २१ सिंचन प्रकल्प सरासरी ५२ टक्के भरले आहेत.