शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा पाणीप्रश्नी अंतिम सुनावणीस सुरुवात

By admin | Updated: March 10, 2016 03:36 IST

नाशिक-अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध, अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत

मुंबई : नाशिक-अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध, अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणीस बुधवारपासून सुरुवात झाली. गुरुवारीही या याचिकांवर युक्तिवाद सुरूच राहणार आहे.गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) ७ आॅक्टोबर रोजी नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी पिण्यासाठी व पिकांसाठी सोडण्यात येणार असल्याचे जीएमआयडीसीने जाहीर केले. जीएमआयडीसीच्या या निर्णयाला नाशिक-नगरच्या शेतकऱ्यांनी व साखर कारखानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर मराठवाड्याच्या रहिवाशांनीही जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, यासाठी याचिका दाखल केल्या आहेत. डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने १२. ८४ टीमएसीपैकी १० टीमएसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची परवानगी सरकारला दिली होती. त्यानंतर मात्र, उच्च न्यायालयाने उर्वरित २.८४ टीमएसी पाणी जायकवाडीत सोडण्यास नकार देत, अंतिम सुनावणीनंतर यावर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. यानुसार, बुधवारपासून मराठवड्यातील पाणीप्रश्नासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील अंतिम सुनावणीस सुरुवात झाली. या याचिकांवरील सुनावणी गुरुवारीही सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)