शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील दुष्काळाची ‘युनिसेफ’कडून पाहणी

By admin | Updated: June 12, 2016 03:54 IST

ग्रामीण भागातील लोकांवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी ‘युनिसेफ’च्या पथकाने शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावात सर्वेक्षण केले.

लातूर : ग्रामीण भागातील लोकांवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी ‘युनिसेफ’च्या पथकाने शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावात सर्वेक्षण केले. देशातील १७ राज्यांत दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे़ दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी भविष्यात कशा पद्धतीने नियोजन करावे़ तसेच तीन वर्षांपासून उद्भवलेल्या दुष्काळाची प्रमुख कारणे काय?, याचा शोध आणि अभ्यास करण्यासाठी युनिसेफ व रेडआर या दोन संस्थांचे नऊ सदस्यांचे पथक बीड व लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ७ ते १० जून या कालावधीत लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात वांजरवाडा व उमरदरा, अहमदपूर तालुक्यातील काही गावांची पथकाने पाहणी केली. शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावांची पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा केली़ पाणी साठविण्याच्या टाक्यांचेही त्यांनी निरीक्षण केले. पथकप्रमुख युसुफ कबीर, युधिष्ठीर पाणीग्रही, भारती ताहिल्यानी, वल्लरी अग्रवाल, मिनाक्षी झा, डॉ़ मंगेश गढरी, डॉ़ पुष्कर देशमुख, भाऊसाहेब पवार, डॉ़ समीर पेठे, शुभांगी गुरवे यांचा समावेश होता. मंगळवारपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या या पथकाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला़ त्यांच्याकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची चार वर्षांची माहिती संकलित केली. शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याशीही युसुफ कबीर यांनी चर्चा केली़ (प्रतिनिधी)अहवाल बनविणारलातूर व बीड जिल्ह्यात केलेल्या पाहणीचा अहवाल तयार होणार आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे पथकातील सदस्य समीर पेठे यांनी सांगितले.