शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मराठीप्रेमींचा निर्धार मेळावा

By admin | Updated: November 2, 2016 20:01 IST

गोव्यातील हजारो मराठीप्रेमी येत्या 13 रोजी पणजीत एकत्र येणार आहेत. सरकारने येत्या निवडणुकीपूर्वी मराठीला राज्येभाषेचे स्थान द्यावे अशी मागणी करण्यासाठी

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 02 - गोव्यातील हजारो मराठीप्रेमी येत्या 13 रोजी पणजीत एकत्र येणार आहेत. सरकारने येत्या निवडणुकीपूर्वी मराठीला राजभाषेचे स्थान द्यावे अशी मागणी करण्यासाठी हा निर्धार मेळावा निश्चित करण्यात आला आहे.
मराठी राजभाषा समितीतर्फे गो. रा. ढवळीकर, माजी आमदार मोहन आमशेकर, माजी महापौर अशोक नाईक, निर्धार मेळाव्याचे प्रमुख कार्यवाही मंगेश कुंडईकर, युवा अध्यक्ष मच्छींद्र च्यारी आदींनी येथे पत्रकार परिषदेत मेळाव्याबाबत माहिती दिली. सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेऊन मराठी राजभाषेसंबंधी जागृती करण्यात आली  आहे. सर्व तालुक्यांमध्ये संपर्क प्रमुखही नेमण्यात आले आहेत. महिला व युवा समितीही नेमण्यात आली आहे. मराठीच्या चळवळीतील विविध संस्था, संघटना, संप्रदाय यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मराठीला राजभाषेचे स्थान देण्यासाठी सरकारवर दबाव यायला हवा. यासाठी पणजीत शक्ती प्रदर्शन केले जाईल, असे कुंडईकर, आमशेकर व इतरांनी सांगितले. भारतीय भाषा सुरक्षा मंचनेही आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे. त्यांनीही निर्धार मेळाव्यात भाग घ्यावा, असे आवाहन ढवळीकर यांनी केले. आमच्यासारखे अनेकजण भाषा सुरक्षा मंचसोबत होते. गोवा सुरक्षा मंचने आपल्या निवडणुक जाहिरनाम्यात मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या आश्वासनाचा समावेश करावा, अशी मागणी आमशेकर यांनी केली. मराठी राजभाषा समिती व भाषा सुरक्षा मंच या दोन भिन्न संघटना आहेत. मराठीला राजभाषेचे स्थान द्यावे अशी मागणी भाषा सुरक्षा मंच करत नाही. उलट त्या मागणीशी आपल्याला काही देणोघेणो नाही असे भाषा सुरक्षा मंचने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे आपल्यासह अन्य काहीजणांनी भाषा मंचशी फारकत घेतली. आमची मागणी व भाषा सुरक्षा मंचची मागणी यात फरक आहे, असे मच्छींद्र च्यारी यांनी सांगितले.
आझाद मैदानावर निर्धार मेळावा घेण्याचे आम्ही निश्चित करून लेखी परवानगीही घेतली. त्यानंतर सरकारी यंत्रणोने आझाद मैदान फोडलेले आहे. तथापि, पणजीतच निर्धार मेळावा पार पडेल, असे कुंडईकर यांनी सांगितले.
 
पंतप्रधानही 13 रोजीच गोव्यात
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम येत्या 13 रोजी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे. मोपा विमानतळ प्रकल्प व तुयें येथील इलेक्ट्रॉनिक सिटी या दोन प्रकल्पांसाठी पायाभरणी सोहळा या सभागृहात पार पडेल. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली व पंतप्रधानांच्या भेटीचा कार्यक्रम निश्चित केला.