शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

...तर मराठी टक्का निश्चित वाढेल

By admin | Updated: September 5, 2016 03:26 IST

१०-१२ वी पासून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली तर प्रशासकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा मराठी टक्का निश्चित वाढेल

ठाणे : १०-१२ वी पासून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली तर प्रशासकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा मराठी टक्का निश्चित वाढेल, असे ज्येष्ठ पत्रकार आणि ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश बाळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. मराठा मंडळातर्फे सरस्वती शाळेच्या सभागृहात मार्च २०१६ च्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील ८० व अधिक टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मराठी विद्यार्थ्यांनी या प्रशासकीय सेवांकडे पगाराची शाश्वती असलेल्या नोकरीचे साधन इतकाच दृष्टिकोन न ठेवता याकडे करिअर म्हणून पाहण्याची नितांत गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना प्रशासकीय परीक्षा, त्यांची पूर्वतयारी, देशसेवेची संधी याबाबतीत विस्तृत माहिती देताना ते म्हणाले की, संपूर्ण देशात ही एकमेव संस्था आहे, जिथे हे शिक्षण विनामूल्य दिले जाते. तसेच येथील वाचनालय अद्ययावत आहे. जिथे जगभरात लिहिली गेलेली पुस्तके महिनाभरात वाचनासाठी उपलब्ध होतात. फक्त येथे वसतिगृह नाही. त्यामुळेच ठाणे-मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांनी या संस्थेचा जास्तीतजास्त लाभ घेतला पाहिजे. लेखिका माधुरी ताम्हाणे यांनी ‘जगावं कसं आणि वागावं कसं’ या विषयावर मार्गदर्शन केले. १०-१२ वी पर्यंत शिक्षणाच्या विविध शाखांना प्रवेश घेण्यासाठी गुणांच्या टक्केवारीचे महत्त्व आहे. परंतु, त्यानंतरच्या आयुष्यात यशस्वी करिअर करण्यासाठी आणि जीवनातील अत्युच्च ध्येय गाठण्यासाठी शिस्त, सातत्य, वक्तशीरपणा, नम्रपणा या गुणांचे महत्त्व टक्क्यांइतकेच आहे. किंबहुना जास्त आहे. टक्क्यांची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. एखादा छंद जोपासा, ज्यायोगे नेहमी ताजेतवाने राहाल आणि अभ्यासाचा ताण मेंदूवर येणार नाही.>परदेशात गेलात तरी मातृभूमीला विसरू नकाशिक्षण अथवा पैसे कमवण्यासाठी तुम्ही भावी आयुष्यात परदेशात गेलात तरी आपल्या मातृभूमीला आणि आईवडिलांना विसरू नका. संधी मिळताच येथे परत या, असा सल्ला मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी दिला. मंडळाचे चिटणीस राजेंद्र साळवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन अपर्णा साळवी, विनय परब, सयाजी मोहिते यांनी केले. रोख पारितोषिके, भेटवस्तू आणि सन्मानप्रमाणपत्र देऊन पावणेदोनशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.