शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

By admin | Updated: February 28, 2016 03:35 IST

ष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’ शनिवारी शहर-उपनगरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्य शासनाप्रमाणेच

मुंबई : ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’ शनिवारी शहर-उपनगरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्य शासनाप्रमाणेच शाळा, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांतर्फे निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. एरव्ही ‘डे’ सेलीब्रेट करण्याची संस्कृती जपणारी तरुण पिढीही याला अपवाद ठरली नाही. जोगेश्वरीत आयोजित ग्रंथमहोत्सवात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. या ग्रंथमहोत्सवाची सुरुवात श्रमिक विद्यालय, बांदिवली विद्यालय, बालविकास विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद विद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या ग्रंथदिंडीने करण्यात आली. या वेळी शाखा क्र. ६८ चे नगरसेवक अनंत (बाळा) नर, नगरसेवक जितेंद्र वळवी, विश्वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, साधना माने, अनंत भोसले, आयडियल बुक डेपोचे मालक मंदार नेरुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. दादर येथील आयडिल बुक डेपो आणि अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्यातर्फे ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नव्याने प्रकाशित करण्यात आलेली पुस्तकेही ठेवण्यात आली असून ही पुस्तके माफक दरात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुंबई काँग्रेसतर्फे साहित्य, संगीत संस्कृती, एकपात्री आविष्कार, कथा, कविता इत्यादी कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहाने राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. बोरीवली येथील बी. के. कृष्णा मेनन अ‍ॅकॅ डमीमध्ये मल्याळी भाषेतील विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी यासाठी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला, तर जोगेश्वरी येथील फारुक गर्ल्स हायस्कूलमध्ये उर्दू मुलांना मराठीची गोडी लागावी यासाठी मराठी राजभाषा दिन आवर्जून साजरा करण्यात आला.विलेपार्ले येथील माधवराव भागवत महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या मराठी वाङ्मय विभागातर्फे ‘गीत गाईन नवे’ या संगीताचे सादरीकरण करण्यात आले.माहीम सार्वजनिक वाचनालयात ‘मराठी नाटकातलं आणि नाटकाबाहेर’ या अनोख्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला. अंधेरीतील अरुणोदय प्रतिष्ठानतर्फे ‘आला रे आला’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. चिंचपोकळी येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आणि समर्थ ग्रंथालयाच्या वतीने कविता वाचनाचा कार्यक्रम करण्यात आला. ‘मराठी राजभाषा दिन’ शनिवारी मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा झाला. उपनगरी रेल्वे स्थानकांवर दिवसभर मराठी अभिमान गीत वाजविण्यात येत होते. राज्य शासनाप्रमाणेच शाळा, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांतर्फे निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.