शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत पुन्हा रंगणार मराठी नाट्यमहोत्सव

By admin | Updated: May 10, 2014 11:25 IST

मराठी नाट्य परिषद आणि अनेक दिग्गज रंगकर्मी एकत्र येऊन मराठी नाटकांचा झेंडा सातासमुद्रापार फडकवण्यास सज्ज झाले असून अमेरिकेत पुन्हा एकदा मराठी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १०  - मराठी नाट्य परिषद आणि अनेक दिग्गज रंगकर्मी एकत्र येऊन मराठी नाटकांचा झेंडा सातासमुद्रापार फडकवण्यास सज्ज झाले असून अमेरिकेत पुन्हा एकदा मराठी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी व कार्यवाह दीपक करंजीकर  यांच्या पुढाकाराने संपूर्ण दशकभरानंतर पुन्हा एकदा हा नाट्यमहोत्सव रंगणार असून अजित भुरे, प्रदीप वैद्य आणि राजन ताम्हाणे यांचीही त्याला साथ लाभणार आहे. यापूर्वी १९९८ साली सुधीर भट व गोपाळ अलगेरी ह्या जोडीने सुयोग संस्थेच्या चार नाटकांचा नाट्यमहोत्सव ही कल्पना अमेरिकेत नेली. तिथे अत्यंत लोकप्रिय ठरलेला हा महोत्सव २००४ सालानंतर काही कारणांमुळे होऊ शकला नाही. मात्र आता हा नाट्यमहोत्सव पुन्हा सुरू होणार असल्याने नाट्य रसिकांना चांगल्या नाटकांचा पुन्हा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. 
२४ मे ते १५ जून या कालावाधीत होणा-या नाट्य महोत्सवात 'काटकोन त्रिकोण', 'मी रेवती देशपांडे' 'भय इथले संपत नाही' आणि 'प्राईस टॅग'  अशी एकाहून एक सरस नाटके पाहण्याचा योग येणार आहे. हा नाट्यमहोत्सव अमेरिकेत न्यू जर्सी, बॉस्टन, डेट्रॉईट, शइकागो, लॉस एंजिलिस, सिअ‍ॅटल, रॅले अशा प्रमुख शहरांमधील महाराष्ट्र मंडळांतर्फे संपन्न होणार आहे.