शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती अयोग्य

By admin | Updated: February 28, 2017 04:32 IST

रिक्षा- टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेची सक्ती करणे सकृतदर्शनी अयोग्य असल्याचे मत सोमवारी उच्च न्यायालयाने नोंदवले.

मुंबई : रिक्षा- टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेची सक्ती करणे सकृतदर्शनी अयोग्य असल्याचे मत सोमवारी उच्च न्यायालयाने नोंदवले. परिवहन विभागाने काढलेल्या या परिपत्रकाच्या वैधतेबाबत मंगळवारी उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.मीरा-भार्इंदर रिपब्लिकन रिक्षा चालक-मालक युनियनने परिवहन विभागाने २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अन्य रिमीरा-भार्इंदर रिपब्लिकन रिक्षा चालक-मालक युनियनने परिवहन विभागाने २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्याबरोबर अन्य रिक्षा, टॅक्सी संघटनांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. परिवहन विभाग अशाप्रकारे परिपत्रक काढून मराठी भाषेची सक्ती करू शकत नाही. त्यासाठी त्यांनी कायद्यात सुधारणा केली पाहिजे किंवा सरकारने धोरण आखले पाहिजे. कोणीही परवाना घेऊन अन्य कोणालाही गाडी चालवण्यासाठी देऊ शकते. सरकारने सारासार विचार न करता ही अट घातली आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. संदीप शिंदे यांनी खंडपीठापुढे केला. बॅच देण्यासाठी राज्य सरकार ही अट घालू शकते. त्याला आम्ही आव्हान दिलेले नाही, असेही शिंदे यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी) >मंगळवारी निर्णयशिंदे यांच्या या युक्तिवादाशी सहमती दर्शवत उच्च न्यायालयाने नव्या रिक्षा-टॅक्सींसाठी परवाना मिळवण्याकरिता मराठी भाषेची सक्ती करणे सकृतदर्शनी अयोग्य असल्याचे म्हणत या परिपत्रकासंबंधीचा निकाल मंगळवारी देऊ, असे स्पष्ट केले.