शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

मलेशिया, हाँगकाँगमध्ये मराठी दिन जल्लोषात

By admin | Updated: March 21, 2017 17:28 IST

मलेशिया, हाँगकाँगमधील महाराष्ट्र मंडळाने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - मलेशिया, हाँगकाँगमधील महाराष्ट्र मंडळाने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अन् विदेशात कार्यरत असणाऱ्या मराठी माणसांनी मातृभाषा संवर्धनाचे अनोखे उपक्रम घेतले. हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाने कै़ लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतीचित्रे' या अजरामर आत्मचरित्रातील निवडक उताऱ्यांचे वाचन करून मराठी दिन वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा केला़ लक्ष्मीबार्इंनी अगदी रंजक, गोष्टीवेल्हाळ पद्धतीने आपल्या आयुष्यातील घटनांचे कथन पुस्तकात केले आहे़ सोपी, सरळ, सहज समजणारी भाषा, छोटी वाक्ये व संवादातून प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे कौशल्य आणि त्यावरचे मिश्किल भाष्य या सोहळ्यात ऐकायला मिळाले़ हाँगकाँगमधील मराठी भाषिक 'वाचनमात्रे' हा उपक्रम घेतात़ मुग्धा रत्नपारखी यांच्या या वाचनमात्रे संकल्पनेला सुनील कुलकर्णी यांनी साथ दिली आहे़ त्यांच्या समवेत मनोज कुलकर्णी, नितीन राजकुंवर, अरुणा सोमन, दिपाली भाटवडेकर हेही वाचनात सहभागी झाले़ हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मनोज कुलकर्णी म्हणाले, मंडळ दोन वर्षांपासून वाचनमात्रे उपक्रम घेत आहे़ प्रत्येकजण आपल्या आवडलेल्या पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे वाचन करतो़ हा प्रवास साने गुरुजी, विजय तेंडूलकर, व़पूक़ाळे असा आहे़ या माध्यमातून भाषा जोपासण्याचा एक सकारात्मक प्रयत्न केला जात आहे़ दरम्यान, मलेशिया येथील महाराष्ट्र मंडळाने क्वालालंपूर येथे साहित्यसंध्या हा कथाकथन व काव्यवाचनाचा कार्यक्रम घेतला. कुसुमाग्रज, वसंत बापट, बा़भ़बोरकर आदींच्या कवितांचे वाचन झाले़ स्वरचित कविता व कथांचेही वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष संजय दीक्षित यांनी केले़ सचिव डॉ़अमेय हसमनीस, संदेश सावर्डेकर, बिनाका सावंत यांनी साहित्यसंध्याच्या उत्कृष्ट आयोजनासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)