शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा परवान्यासाठी आता मराठीची सक्ती!

By admin | Updated: September 16, 2015 03:33 IST

गेले १८ वर्षे नव्या रिक्षा परवान्यांवर असलेली बंदी उठवली खरी, परंतु नवे परवाने मिळण्याकरिता मराठी बोलता येणे सक्तीचे करण्यात आल्याने सरकारचा हा निर्णय वादग्रस्त

मुंबई : गेले १८ वर्षे नव्या रिक्षा परवान्यांवर असलेली बंदी उठवली खरी, परंतु नवे परवाने मिळण्याकरिता मराठी बोलता येणे सक्तीचे करण्यात आल्याने सरकारचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर क्षेत्रात १ लाख तर पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आणि पिंपरी-चिंचवड येथे २५ टक्के नव्या रिक्षा रस्त्यावर येतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. रावते म्हणाले की, राज्य शासनाने २६ नोव्हेंबर १९९७ रोजी रिक्षा, टॅक्सी परवान्याची संख्या सीमित केली आहे. परंतु वाढती प्रवासी संख्या व रिक्षांची मागणी लक्षात घेऊन मुंबई महानगर क्षेत्रात नवीन १ लाख परवाने देण्यात येणार आहेत. नवीन परवान्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात १५ हजार रुपये तर राज्यातील इतर भागात १० हजार रुपये परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)आॅक्टोबरमध्ये नूतनीकरणराज्यातील रिक्षांचे १ लाख ४० हजार ६५ परवाने विविध कारणास्तव रद्द झाले होते. परवाने नूतनीकरण सहा महिन्यांत केले नाही, तर दंड आकारण्याची सध्याची तरतूद आहे. परंतु, अनेक रिक्षा दंड न भरताच रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात २० हजार रुपये तर राज्यातील इतर क्षेत्रात १५ हजार रुपये नूतनीकरण शुल्क आकारून परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. १ ते ३० आॅक्टोबर या काळात नूतनीकरण केले जाणार आहे. नूतनीकरण न केल्यास कारवाई केली जाणार आहे. - लॉटरी पद्धतीने हे परवाने दिले जातील. महाराष्ट्रात १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वास्तव्य आहे किंवा कसे हे कसून तपासण्यात येईल. - जात-धर्म पाहणार नाही पण मराठी बोलता येणे सक्तीचे. तसेच रिक्षांना जीपीएस व जीपीआरएस यंत्रणा बसवणे आवश्यक.-१ लाख ४० हजार ६५ रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे परिवहन विभागाने ठरवले आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीत ३२५ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.