शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बेळगाववर पुन्हा मराठी झेंडा

By admin | Updated: March 5, 2016 04:08 IST

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी सरिता पाटील आणि उपमहापौरपदी संजय शिंदे निवडून आले. हे दोघेही मराठी असून, यानिमित्ताने मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी सरिता पाटील आणि उपमहापौरपदी संजय शिंदे निवडून आले. हे दोघेही मराठी असून, यानिमित्ताने मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे.या दोन्ही पदांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. नवनिर्वाचित महापौर सरिता पाटील यांना ३२, तर कन्नड उर्दू गटाच्या प्रतिस्पर्धी जयश्री माळगी यांना २५ मते मिळाली. उपमहापौर निवडणुकीत संजय शिंदे यांना ३१, तर प्रतिस्पर्धी महांतेश कागतीकर यांना २५ मते मिळाली. मराठी भाषिक नगरसेवकांनी बेळगाव विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन निवडणूक लढवली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्तपदाचा पदभार सांभाळणारे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी काम पाहिले. निवडणुकीची प्रक्रिया सुरूझाल्यावर सकाळी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी एकूण ९ अर्ज दाखल करण्यात आले होते. महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने नगरसेवक पिंटू सिद्दकी यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. ४ मराठी भाषिक नगरसेविकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विरोधी कन्नड, उर्दू गटाच्या अनुश्री देशपांडे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे महापौरपदासाठी सरिता पाटील आणि जयश्री माळगी यांच्यात सरळ लढत झाली. उपमहापौरपदासाठी संजय शिंदे आणि विरोधी गटाचे महांतेश कागतीकर यांच्यात लढत झाली. शिंदे यांना ३१, तर महांतेश कागतीकर यांना २५ मते मिळाली. ऐनवेळी उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेल्या नागेश मंडोळकर यांनी उपमहापौर निवडणुकीत मतदान केले नाही. महापौर आणि उपमहापौर यांची निवड जाहीर झाल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील, आमदार फिरोज सेठ यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)