शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नगरसेवक पदांचा त्याग करतील

By admin | Updated: June 30, 2015 00:24 IST

किरण सायनाक : बेळगावात एकीकरण समितीचा महामेळावा; कर्नाटक सरकारच्या विरोधातील ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर

बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा निकाल २०१६ मध्ये लागणार असून, महाराष्ट्र सरकारने दाव्याची संपूर्ण तयारी केली आहे. २०१६ पर्यंत निकाल लागला नाही तर मी आणि माझे नगरसेवक कोणत्याही पदाचा त्याग करण्यास तयार आहोत. आम्ही सदैव मराठी भाषिकांच्या पाठीशी राहणार आहोत, असे उद्गार बेळगावचे महापौर किरण सायनाक यांनी सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात बोलताना काढले.कर्नाटक सरकारने सोमवारपासून सुवर्णसौधमध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात केली आहे. यापूर्वी कर्नाटक सरकार बेळगावात हिवाळी अधिवेशन दरवर्षी घेत होते. यावर्षी प्रथमच पावसाळी अधिवेशन घेऊन बेळगाववरचा हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला प्रत्त्युतर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा मंदिर येथे महामेळावा आयोजित केला होता.महामेळाव्याचे अध्यक्षस्थान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार वसंतराव पाटील यांनी भूषविले होते. व्यासपीठावर महापौर किरण सायनाक, उपमहापौर मीना वाझ, आमदार संभाजी पाटील,आमदार अरविंद पाटील, शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, निन्गोजी हुद्दार, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजनही महामेळाव्याच्या प्रारंभी करण्यात आले. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा, मराठी भाषिकांना घटनेने दिलेले अधिकार द्यावेत, नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचे अभिनंदन, कर्नाटक सरकार करीत असलेल्या बेकायदेशीर कृत्याचा निषेध, असे ठराव महामेळाव्याच्या प्रारंभीच टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले . कर्नाटक सरकार बेळगावात घेत असलेल्या पावसाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महामेळावा आयोजित केला असून, कर्नाटक सरकार जेव्हा अधिवेशन भरवेल मराठी भाषिक त्याला विरोध करण्यासाठी आणि आपली ताकद दाखवून देण्यासाठी महामेळावा घेतील. कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांचे खच्चीकरण करून अन्याय करीत आहे. मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतेले आहेत. घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठीही प्रयत्न सुरूआहे, असे उद्गार माजी आमदार मनोहर किणेकर यांनी काढले. (प्रतिनिधी) आमदारांचा सुवर्णसौधमध्ये सभात्यागभगवे फेटे परिधान केलेल्या आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील यांनी पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होताच सीमाप्रश्नासंबंधी घोषणा देऊन सुवर्णसौधमध्ये सभात्याग केला आणि महामेळाव्याला हजेरी लावली. महामेळाव्याच्या स्थळी भगवे ध्वज लावण्यात आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. महामेळाव्याला महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांनी महामेळाव्याला पाठिंबा दर्शवून सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचा संदेश पाठवून दिला.