शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
2
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
3
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
4
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
5
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
6
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
7
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
8
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
9
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
10
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
11
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
12
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
13
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
14
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
15
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
16
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
17
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
19
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
20
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?

मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नाहीत, १८८५ च्या साताऱ्याच्या राजपत्रात नोंद

By हणमंत पाटील | Updated: September 3, 2025 14:17 IST

१८८१ च्या जनगणनेत ५ लाख ८३ हजार कुणबी

हणमंत पाटीलसातारा : १८८५ च्या शासकीय राजपत्रात (गॅझेट) सातारा जिल्ह्यातील मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे. दोन्हींची वंश परंपरा एकच आहे. त्यांच्या विवाह पद्धती, धार्मिक कार्यक्रम व राजवंशीय आडनावे एकच आहेत. ‘शेती’ हा प्रमुख व्यवसाय असल्याने मराठे बहुधा कुणबींपेक्षा काही वेगळे नसतात, अशी नोंद शासकीय राजपत्रात आढळते.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईतील आंदोलन सातारा व औंध गॅझेटमधील नोंदीची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनानंतर मंगळवारी मागे घेण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर १८८५ च्या मुंबई गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणबी व मराठा नोंदी सापडतात. शासकीय राजपत्रातील ‘चॅप्टर ३’मधील पान क्रमांक ७५ मध्ये सातारा जिल्ह्यातील मराठा व कुणबी एकच असल्याच्या नोंदीचा उल्लेख आहे. शिवाय सांगलीचा समावेश असलेल्या जुन्या सातारा जिल्ह्याची १८८१ साली शासकीय जनगणना झाली. त्यामध्ये जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ६ लाख ८ हजारची नोंद आहे.

मराठा व कुणबी वेगळी गणना नाही..जिल्ह्यात सर्वत्र आढळणारे मराठा लोक कुणबी म्हणून ओळखले जातात. १८८१ जनगणनेनुसार त्यांची नोंद कुणबी म्हणून केली आहे. त्यामध्ये मराठा व कुणबी यांची जनगणना वेगवेगळी झालेली नाही. त्यांची कुणबी म्हणून एकत्रच जनगणना झाली असून, त्यांच्या लोकसंख्येची नोंद ५ लाख ८३ हजार इतकी आहे. काही मराठा परिवारांमध्ये राजपूत वंशाचा थोडासा प्रभाव असू शकतो; पण हे नेहमीच असते असे नाही. कुणबी आणि मराठा यातील भेद सामाजिक दिसतो. दोघांचा मुख्य व्यवसाय ‘शेती’ असला तरी मराठे सामान्यतः कुणबींपेक्षा स्वत:ला प्रतिष्ठित समजतात. ते शेतीपेक्षा युद्धाला प्राधान्य देताना दिसतात, अशी नोंद आहे.

कुळाची ओळख गाव व व्यवसायानुसार..जुन्या राजवंशांची आडनावे : जसे-चोलके, कदंब, यदुवंशी, सोलंकी, शिल्हर, यादव ही आडनावे ‘कुणबी किंवा मराठा’ समाजांमध्येही आढळतात. ही आडनावे इतर जातींमध्येही वापरली जातात. त्यामुळे आडनावाचा अर्थ ‘उत्तरी वंश’ होतो, असा अर्थ लावणं अचूक नसते; हे आडनाव फक्त संचलित किंवा मुख्य आडनाव म्हणून ग्रहण केले गेलेले असू शकते. परंतु, गाव व व्यवसायानुसारही आडनावे असू शकतात.

एकच धार्मिक व सांस्कृतिक विधी..कुणबी आणि मराठा यांच्या जन्मकथांमध्ये फारसा फरक नाही. विवाह विधीदेखील अगदी समान असतात. लग्नाच्या पूर्वी शुभ मुहूर्त पाहणे. लग्नाची धार्मिक परंपरा व रीतीरिवाज दोन्हींमध्ये सारखेच आढळतात.

सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी आपल्या राज्यात १८१९ मध्ये जनगणना राबवली. ही जनगणना जातनिहाय होती. कोणत्या जातीचे किती लोक कोणत्या गावात राहतात. त्यांचे व्यवसाय काय, त्यांचे राहणीमान कसे आहे. या सर्व गोष्टींविषयी नोंदी करून त्यानुसार रोजगार व विकास योजना राबविण्यास त्यांनी सुरुवात केली होती. या जनगणनेत शेती करणाऱ्या मराठ्यांच्या गावागावांत कुणबी म्हणून नोंदी आढळतात. ज्यांचा व्यवसाय शेती आहे, परंतु ते मराठा समाजातील आहेत, त्यांची कुणबी म्हणूनच नोंद करण्यात आली. परंतु काही ठिकाणी कुणबींचा मराठा म्हणून सुद्धा उल्लेख आढळतो. मुळात काही सरदार अथवा प्रतिष्ठित मराठा समाजातील लोक हे स्वतःला कुणबी न म्हणवता मराठा म्हणून उल्लेख करत त्यामुळे या नोंदींमध्ये तशी तफावत आढळून येते. हीच पद्धती पुढे ब्रिटिशांनी सुरू ठेवली. सध्या चर्चेत असलेल्या १८८५ च्या गॅझेटमध्ये या नोंदी आढळतात. - नीलेश झोरे, इतिहास अभ्यासक, सातारा.

सातारा गॅझेटिअर मान्य झाल्यास न्याय : ॲड. बाबासाहेब मुळीकस्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात सध्या सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव, पलूस हे तालुके समाविष्ट होते. १८८५ च्या सातारा गॅझेटिअरमध्ये १८८१ च्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख होती. त्यापैकी कुणबी समाजाची लोकसंख्या ५ लाख ८३ हजार इतकी नोंदली आहे. त्या वेळी मराठा व कुणबी समाजाची स्वतंत्र जनगणना झालेली नव्हती. "सातारा गॅझेटिअर मराठे व कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे. या सातारा गॅझेटिअरची अंमलबजावणी झाल्यास सांगली जिल्ह्यातील या सहा तालुक्यांतील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होईल,” अशी प्रतिक्रिया विधिज्ञ ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी दिली.