शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण; मुद्दा मागासवर्ग आयोगाकडे?

By admin | Updated: April 18, 2017 05:29 IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यास हरकत नसल्याचे, सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यास हरकत नसल्याचे, सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले. तथापि, या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देऊन न्यायालयाने पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी ठेवली आहे.राज्य सरकारने २५ जून २०१४ रोजी नोकरी व शिक्षण क्षेत्रात मराठा (१६%) आणि मुस्लिमांना (५%) आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या, तसेच राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.मराठा समाज आजही शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागासलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने जमा केलेली माहिती छाननी व विश्लेषणासाठी मागासवर्ग आयोगाकडे पाठवयाची की नाही, याबाबत राज्य सरकारसह सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, सोमवारच्या सुनावणीत सर्वांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली.मराठा आरक्षणाचा मुद्दा मागासवर्ग समितीकडे पाठवण्यास राज्य सरकारची हरकत नसल्याची माहिती सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली, परंतु याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत, या याचिकांवरील सुनावणी २७ एप्रिल रोजी ठेवली आहे. या प्रश्नावर मराठा संघटना आक्रमक असून, त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)