शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात घुमला मराठ्यांचा बुलंद आवाज!

By admin | Updated: February 17, 2017 02:54 IST

न्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये गुरुवारी ठणकावून सांगत क्रांती मूक

संतोष मिठारी, प्रदीप शिंदे, प्रकाश बेळगोजी / बेळगावन्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये गुरुवारी ठणकावून सांगत क्रांती मूक मोर्चातून सीमाप्रश्नाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. कर्नाटकातील कानाकोपऱ्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यांतून सुमारे दहा लाख समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. इतिहासात मराठ्यांचा पराक्रम पाहिलेल्या या भूमीत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून वेगळा इतिहास घडविला.प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे बेळगावमधील या सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने मोर्चाच्या आदल्याशिवाय जाचक अटी घालूनसुद्धा मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाज निर्भीडपणे सहभागी झाला.छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला रणरागिणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या मार्गावर स्वयंसेवकांनी मानवी साखळी करून प्रथम युवती, महिला, ज्येष्ठ व्यक्तींना सोडले. त्यापाठोपाठ पुरुष, युवक सहभागी झाले. कोणत्याही घोषणा, जयजयकार न करता लाखोंचा जनसमुदाय मोर्चाच्या आचारसंहितेचे पालन करीत शिस्तीबद्धपणे पुढे सरकत होता. कपिलेश्वर उड्डाणपूल, शनि मंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, डॉ. राजेंद्रप्रसाद चौक मार्गे धर्मवीर संभाजी चौकात मोर्चा पोहोचला. तेथे रणरागिणींचे भाषण झाले. त्यानंतर या मुलींनी जिल्हाधिकारी एन. जयराम यांना निवेदन दिले.