शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बेळगावात मराठा महासागर

By admin | Updated: February 17, 2017 01:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सकल मराठा, मराठी क्रांती मूक मोर्चाला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी

संतोष मिठारी, प्रदीप शिंदे, प्रकाश बिलगोजी ---बेळगाव --न्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये गुरूवारी ठणकावून सांगत क्रांती मूक मोर्चातून सीमाप्रश्नाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. कर्नाटकातील कानाकोपऱ्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यातून मराठा व मराठी बोलणाऱ्यांचा महासागर बेळगावमध्ये धडकला. इतिहासात मराठ्यांचा पराक्रम पाहिलेल्या या भूमीत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून वेगळा इतिहास घडविला.प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे बेळगावमधील या सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने मोर्चाच्या आदल्याशिवाय जाचक अटी घालून परवानगी देऊन सुद्धा मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा व मराठी बांधव-भगिनी निर्भीडपणे सहभागी झाल्या. मोर्चात सुमारे दहा लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी झाल्याचा दावा मोर्चाच्या संयोजकांनी केला. सकाळी आठ वाजल्यापासून बेळगांवमध्ये मराठा बांधव येऊ लागले. काहीवेळातच शहरातील विविध मार्ग गर्दीने फुलून गेले. मोर्चा सुरू होणाऱ्या शिवाजी उद्यान याठिकाणाच्या दिशेने महिला, परुष, युवक-युवतींचे जथ्थेच्या जथ्थे येत होते. यातील बहुतांश जणांच्या हातात भगवा ध्वज, विविध मागण्यांचे फलक, ‘एक मराठा लाख मराठा’ ‘मी मराठा’ असा उल्लेख असलेली डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात स्कार्फ आणि अंगात काळे टी-शर्ट होते, तर महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. सकाळी नऊ वाजता शिवाजी उद्यानाचा (पान ४ वर)परिसर गर्दीने खचाखच भरुन गेला.या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मथुरा कुंडेकर, प्रांजल धामणेकर, सलोनी पाटील, गौतमी उगाडे आणि वैष्णवी कडोलकर या रणरागिणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या मार्गावर स्वयंसेवकांनी मानवी साखळी करुन प्रथम युवती, महिला, ज्येष्ठ व्यक्तींना सोडले. त्यापाठोपाठ पुरूष, युवक सहभागी झाले. कोणत्याही घोषणा, जयजयकार न करता लाखोंचा जनसमुदाय मोर्चाच्या आचारसंहितेचे पालन करीत शिस्तीबद्धपणे पुढे सरकत होता. रखरखत्या उन्हाचा तडाखा बसत असताना देखील विविध गल्ली-बोळांतून महिला-पुरूष या जनसागरात सहभागी होत होते. मोर्चातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मराठी अस्मिता आणि मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा पक्का निर्धार स्पष्टपणे दिसत होता. नि:शब्द वातावरणात निघालेल्या या मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्त झाली. कपिलेश्वर उड्डाणपूल, शनि मंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, डॉ. राजेंद्रप्रसाद चौक मार्गे धर्मवीर संभाजी चौकात मोर्चा पोहोचला. याठिकाणी आसावरी पाटील, तृप्ती सडेकर, निकिता घुंगरेटकर, अस्मिता देशमुख, प्रांजल जुवेकर, भक्ती तेरसे, ऋतुजा पाटील, सलोनी पाटील या रणरागिणींचे भाषण झाले. जिल्हाधिकारी एन. जयराम यांना रेश्मा उचगावकर, सोनल चौगले, नयना जगताप, नेत्रा उचगांवकर, पूजा उचगांवकर या रणरागिणींनी समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. मोर्चा संपला, तरी अनेक बांधव, भागिनी शहरात दाखल होत होते. तब्बल चार तास मोर्चा चालला. मोर्चाचे संयोजक व अन्य बांधवांना भेटून जात होते. मोर्चा संपल्यानंतर तासभरातच संयोजक, स्वयंसेवकांनी मार्गाची स्वच्छता केली.मिरच्यांचा खाट तरीही शिस्तीचा थाटमोर्चाच्या प्रमुख मार्गावरील कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या अलीकडे मिरची मार्केट आहे. येथून मोर्चा जात असताना रस्त्यावर पडलेल्या मिरच्या मोर्चेकऱ्यांनी तुडविल्याने धूळ आणि मिरच्यांचा खाट येथे उठला. त्यामुळे येथील मोर्चेकऱ्यांना ठसका लागला, तर काहींनी भोवळ आली. अशा परिस्थितीतसुद्धा मोर्चा शिस्तपणे आणि शांततेत पुढे सरकत राहिला. क्षणचित्रे...मोर्चात शांतता, संयम, माणुसकी, एकतेचे दर्शनमहाराष्ट्र, गोवा राज्यांतील मराठा बांधवांचा सहभागरखरखत्या उन्हात तब्बल तीन तास चालला मोर्चामहिलांचा लक्षणीय सहभाग२ हजार पोलिसांचा बंदोबस्तशहरात सात किलोमीटरच्या मोर्चेकऱ्यांच्या लांब रांगाअवघे शहर बनले भगवेमोर्चा संपताच तासभरात स्वयंसेवकांनी मोर्चाच्या मार्गाची स्वच्छता केली.सोशल मीडियावर मोर्चाचे क्षणाक्षणाला अपडेटस्नऊ ठिकाणी पथकांसह रुग्णवाहिका तैनात