शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

मराठा असल्यानेच माझा छळ; ‘आयजी’ची आत्महत्येची धमकी

By admin | Updated: November 8, 2016 05:33 IST

‘मराठा असल्याने माझा छळ केला जात आहे. या छळाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या स्थितीत आलो असून माझ्या आत्महत्येस आपणच जबाबदार असाल’

अमरावती/ यवतमाळ : ‘मराठा असल्याने माझा छळ केला जात आहे. या छळाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या स्थितीत आलो असून माझ्या आत्महत्येस आपणच जबाबदार असाल’, असा खळबळजनक ‘व्हॉट्स अप’ संदेश अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नावे पाठविल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘डीजीपींकडून होणारी सततची अवहेलना सहनशिलतेपलिकडची आहे. त्यामुळे आत्महत्येची वेळ आली असून स्वत:ला संपविण्यापूर्वी छळाबाबतची प्रत्येक गोष्ट माध्यम आणि कौटुंबिक सदस्यांकडे मांडेन’ अशी धमकीही जाधव यांनी या संदेशात दिली आहे. आत्महत्येची धमकी देणारा हा संदेश जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविल्यानंतर तो काहींनी डीजीपींकडे ‘फॉरवर्ड’केला. शिवाय, हा संदेश सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रासह राज्याच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)माध्यमांना भेटण्यास अधिकाऱ्याचा नकार आत्महत्येच्या कथित धमकीसंदर्भात आयजी विठ्ठल जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, दिवसभर त्यांचा मोबाईल स्वीचआॅफ होता. संध्याकाळी तो सुरू झाला तरी त्यावर ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ...’ ही रिंगटोन ऐकू येत होती. पण फोन उचलला जात नव्हता. जाधव यांच्या निवासस्थानी संपर्क साधला असता ‘त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते कुणासही भेटू इच्छित नाहीत’ असे सांगण्यात आले. सोमवारी नेहमीप्रमाणे जाधव कार्याल्यात आले होते. मात्र, त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला.वादामागे उमरखेड दंगलीची पार्श्वभूमी उमरखेड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यात राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, पोलीस कर्मचाऱ्यांसह १६ जण जखमी झाले होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्कालीन ठाणेदार अनिल पाटील यांनी हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाची चौकशी अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी केली. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडला असताना उमरखेडमध्ये त्याला गालबोट लागले. या घटनेनंतर उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील यांची तेथून बाभूळगाव येथे बदली करण्यात आली. मात्र, पाटील यांना पाठिशी घातल्याचा आरोप आयजी जाधव यांच्यावर आहे. त्यातूनच पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठांशी त्यांचा खटका उडाला होता.राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून माझी सर्वंकष जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने अधिनस्त यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तशा सूचना जाधव यांनासुद्धा देण्यात आल्या. मद्याच्या अंमलात असताना त्यांनी कुणाला काय संदेश पाठविला, याबाबत मला सांगता येणार नाही. - सतीश माथूर, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य. उमरखेड दगडफेकीच्या घटनेची अपर अधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करून अहवाल महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. तो गोपनीय असल्याने त्याबाबत अधिक काही सांगता येणार नाही. मात्र जिल्हा पोलीस यंत्रणेच्या कामकाजातील सुधारणांबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. - अखिलेशकुमार सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ.