शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चा : व्यथा मांडण्यासाठी माता-भगिनी मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:32 IST

मुलीला बारावीत ८० टक्के गुण मिळूनही अपेक्षित अभ्यासक्रमाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. उच्चशिक्षित असूनही आरक्षणामुळे मुलगा सरकारी नोकरीपासून वंचित आहे, अशा व्यथा सांगणाऱ्या हजारो मातांनी आझाद मैदानात उपस्थिती लावून मराठा आरक्षणाची मागणी केली.

सागर नेवरेकर मुंबई : मुलीला बारावीत ८० टक्के गुण मिळूनही अपेक्षित अभ्यासक्रमाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. उच्चशिक्षित असूनही आरक्षणामुळे मुलगा सरकारी नोकरीपासून वंचित आहे, अशा व्यथा सांगणाºया हजारो मातांनी आझाद मैदानात उपस्थिती लावून मराठा आरक्षणाची मागणी केली. राज्यभरातून मुंबईत आलेल्या महिलांनी ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा दिला.आझाद मैदानात पहाटेपासून मोर्चेकºयांनी गर्दी केली होती. त्यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. विशेषत: कोल्हापूर, बीड, सांगली, सातारा जिल्ह्यातून आपल्या कुटुंबीयांसोबतच मोर्चात सामील होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला होता. भायखळा परिसरातून निघालेल्या मोर्चातही महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाटचाल करीत स्वयंसेवकांचीही भूमिका पार पाडली.काही महिलांनी लहानग्यांना कमरेवर घेऊन आझाद मैदान गाठले. चिपळूण येथील रेणुका राजेशिर्के यांना गुडघ्याचा त्रास असूनही त्या पुढच्या पिढीसाठी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता भावी पिढीसाठी पुढाकार घेऊन मोर्चाच्या माध्यमातून संघर्ष करण्याचे ठरविले. त्यामुळे चिपळूणमध्येही महिलांना मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.चिमुरडीच्या घोषणेवर टाळ्यांचा कडकडाटपालघर जिल्ह्यातील बोईसर येथून आलेल्या ईशान्वी देशमुख या तीन वर्षांच्या चिमुरडीने मोर्चाच्या सुरुवातीलाच आंदोलकांमध्ये उत्साह निर्माण केला. अफलातून भाषण कौशल्य असलेल्या या आंदोलकाने, ‘मराठा समाजाला आरक्षण द्या’, ‘महिलांंवर अन्याय होऊ देऊ नका’, ‘आमचे संरक्षण करा’ या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले. ‘तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय!’ या तिच्या घोषणेवर तर टाळ्यांचा कडकडाट झाला.कोपर्डीतील ग्रामस्थही सहभागीअहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थही मोर्चात सहभागी झाले होते. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या मदतीसाठी सारा गाव धावून गेला. ज्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत केली पोलिसांनी त्यांच्यावरच अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले व दोन महिने तुरुंगात डांबून ठेवले, असे कोपर्डीचे सरपंच सतीश सुद्रिक यांनी सांगितले. ते म्हणाले, चौकशीनंतर तक्रारीत तथ्य नसल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला सोडून दिले. आम्ही दोन महिने कारागृहात खितपत पडलो त्याचे काय? अशी विचारणा संतप्त ग्रामस्थांनी केली. मराठा समाजाची ही अवहेलना आम्ही अजून किती दिवस खपवून घेणार, असा सवाल त्यांनी केला.