शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ६ मार्चचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित

By admin | Updated: February 27, 2017 05:16 IST

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे मुंबईत ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आला

औरंगाबाद : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे मुंबईत ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. रविवारी औरंगाबादेत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात दिवसभर मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. राज्यातील २९ जिल्ह्यांचे मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील मोर्चाबाबत चर्चा झाली.मुंबईमध्ये ६ मार्च रोजी आयोजित या मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरांवर बैठका सुरू झाल्या होत्या. मात्र दहावी व बारावीची परीक्षा असल्याचे समोर आले. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोर्चात सहभागी होता येणार नसल्याने मोर्चा पुढे ढकलावा, अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालकांचे म्हणणे विचारात घेऊन ६ मार्च रोजीचा मुंबईतील मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय या राज्यस्तरीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख निश्चित करण्यासाठी लवकरच औरंगाबादेत राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक होणार आहे. राज्यस्तरीय कोअर कमिटीआतापर्यंत ५७ मूक मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाने संपूर्ण जगाला शिस्त आणि संयमाचे दर्शन घडविले आहे. मुंबईतील मोर्चाही विनागालबोट व्हावा, यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर कोअर कमिट्या स्थापन केल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी सात सदस्य राज्यस्तरीय कोअर कमिटीचे सदस्य असतील आणि राज्यस्तरीय कमिटीवरील सर्व सदस्य अराजकीय असतील आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही निर्णय ही कोअर कमिटीच घेईल. कोअर कमिटीशिवाय मराठा क्रांती मोर्चाबद्दल कोणी कोणतीही भूमिका मांडल्यास ती त्या व्यक्तीची वैयक्तिक भूमिका असेल. शिवाय मराठा क्रांती मोर्चाने कोणासही प्रवक्ता म्हणून नियुक्त केलेले नाही, असेही या मोर्चातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>निषेधाचे दोन ठरावरविवारच्या बैठकीत आ. प्रशांत परिचारक आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सैन्य दलातील जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आ. परिचारक यांनी केले होते. तसेच चक्का जाम करणाऱ्या औरंगाबादेतील मराठा तरुणांवर पोलिसांनी मुद्दामहून लाठीहल्ला केला होता.