शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ३० मे रोजी मराठा क्रांती मोर्चा

By admin | Updated: May 20, 2017 02:21 IST

येत्या ३० मे रोजी मुंबईमध्ये सकल मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानापासून निघणारा हा महामोर्चा ‘मूक’ नसेल, असा इशाराही महामोर्चाच्या प्रतिनिधींनी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : येत्या ३० मे रोजी मुंबईमध्ये सकल मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानापासून निघणारा हा महामोर्चा ‘मूक’ नसेल, असा इशाराही महामोर्चाच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. या महामोर्चानंतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार असल्याचेही प्रतिनिधींनी स्पष्ट केले.महामोर्चाचे प्रतिनिधी संभाजी पाटील यांनी सांगितले की, गेल्या १० महिन्यांपासून राज्यभर निघालेल्या मूक मोर्चांनंतरही सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच सरकारकडून मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात प्रकरण असल्याचे सांगून सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. मुळात उच्च न्यायालय वारंवार सरकारला आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देताना दिसत आहे. त्यामुळे आरक्षणाची बाजू मांडण्यात ढिम्मपणा दाखवणाऱ्या सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून केली आहे. ३० मेपूर्वी विशेष अधिवेशनाची घोषणा झाली नाही, तर मराठा समाज आझाद मैदानावरून लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर धडक देईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला आहे.महामोर्चाचे संदीप जाधव म्हणाले की, याआधी निघालेल्या मोर्चांमध्ये स्वच्छतेपासून कायदा-सुव्यवस्था राखण्यापर्यंतची सर्व कामे समन्वयकांनी चोखपणे बजावली आहेत. मात्र या महामोर्चात सर्व जबाबदारी सरकारची असेल. त्यामुळे सरकारने या शेवटच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करत आहोत. अन्यथा यापुढे कृतीतून मराठा समाज आपल्या मागण्या पूर्ण करून घेईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.- सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर बैलगाडी शर्यत आणि हायवेशेजारील बार सुरू करण्यासाठी सरकारने जी तत्परता दाखवली, ती मराठा आरक्षणाबाबत दिसत नाही. परिणामी, मराठा आरक्षणाचा मुद्दा प्राथमिकतेने सोडवण्यासाठी मराठा समाज आपले उपद्रव्य मूल्य, आक्रमकता दाखवणार आहे. म्हणूनच महामोर्चातील ‘मूक’ शब्द वगळल्याचे कदम यांनी सांगितले.