शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चा नियोजन बैठक

By admin | Updated: September 19, 2016 01:09 IST

विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी (दि. १८) आयोजित बैठकीला या समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

पुणे : पुणे शहरात येत्या २५ सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या 'मराठा क्रांती मूक मोर्चा'च्या पूर्वतयारीसाठी विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी (दि. १८) आयोजित बैठकीला या समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के, नगरसेवक अनिल टिंगरे, सतीश म्हस्के, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, मनसेचे विभागाध्यक्ष मोहन शिंदे (सरकार), सहआयुक्त ज्ञानेशवर मोळक, सुनील टिंगरे, सागर माळकर, शशिकांत टिंगरे, रमेश खांदवे, कर्मभूमी प्रतिष्ठानचे सुनील खांदवे (पाटील), लक्ष्मण देवकर, विनोद पवार, धनंजय जाधव, शैलजा मोळक, प्रज्ञेश मोळक, डॉ. रायचंद आढाव, डॉ. दीपक ढेरे, डॉ. दत्ता खैरनार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी अनेकांनी आपले मत नोंदवले व मोर्चा आणि आंदोलनाविषयी सूचना केल्या. विशेष म्हणजे या बैठकीसाठी कुणालाही वैयक्तिक निमंत्रण न देता, केवळ सोशल मीडियावरून माहिती देण्यात आली होती. तरीही नागरिकांनी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्ञानेश्वर मोळक यांनी प्रास्ताविकात मराठा मूक मोर्चा कुठल्याही समाजाविरोधात नसून, मराठ्यांच्या मागण्यांसाठी असल्याचे म्हटले. प्रज्ञेश मोळक यांनी मोर्चाच्या नियोजनाची माहिती देऊन शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. शैलजा मोळक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)प्रकाश म्हस्के म्हणाले, की अनुसूचित जाती-जमाती अत्याचारविरोधी कायद्याचा (अट्रॉसिटी) काही प्रमाणात गैरवापर होत आहे. मराठा समाजाने मागासवर्गीयांवर अन्याय केलेला नाही. पूर्वीची परिस्थिती बदलली असून, मागासवर्गीय समाजही चांगले जीवन जगत असल्याने या कायद्याची गरज उरलेली नाही, त्यामुळे हा कायदाच रद्द झाला पाहिजे.