शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

मराठा समाज नोकरी देईल - शशिकांत पवार

By admin | Updated: November 8, 2015 01:00 IST

मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत असले तरी आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. यापुढे मराठा समाज हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा म्हणून ओळखला जाईल, असे

मुंबई : मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत असले तरी आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. यापुढे मराठा समाज हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा म्हणून ओळखला जाईल, असे अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी नमूद केले. पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शनिवारी एलफिन्स्टन येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शशिकांत पवार यांचा सत्कार केला. या वेळी पवार यांच्या पत्नी सुलभा पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, डॉ.डी.वाय.पाटील, खासदार रामदास आठवले, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार भाई जगताप, आमदार विनायक मेटे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वरमधील आधार तीर्थ आधाराश्रम या आश्रमशाळेला विशेष बाब म्हणून मान्यता देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी भाषणात नमूद केले.दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पाच लाखांचा धनादेश दुष्काळ निधीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हाती यावेळी सुपुर्द करण्यात आला. शिवाय पवार यांच्या ‘जागृती’ या आत्मचरित्रासह स्मरणिकेचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाच मुलांना उम्मीद ए कोशिश या संस्थेने दत्तक घेतले. (प्रतिनिधी)