शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये मराठ्यांचा चक्काजाम

By admin | Updated: January 31, 2017 18:30 IST

मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी शहरातील नगर-औरंगाबाद रोडवरील माळीवाडा बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन केले

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 31 - मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी शहरातील नगर-औरंगाबाद रोडवरील माळीवाडा बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन केले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा, मरठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता. हातात भगवे झेंडे घेऊन शिवाजी पुतळा चौकात मोठे रिंगण करून रस्ता अडविण्यात आला होता. आंदोलनामुळे शहरातून येणारी वाहतूक बायपास मार्गे वळविण्यात आल्याने यावेळी वाहतूक कोंडी झाली नाही. यावेळी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, राजेश परकाळे, बाळासाहेब पवार, कांता बोठे, निखिल वारे, अजय बारस्कर, गणेश भोसले, कैलास गिरवले, अ‍ॅड. अनुराधा येवले, राजेंद्र काळे यांनी मनोगत व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणावर गांभीर्याने निर्णय घेतला नाही, तर ६ मार्च रोजी मुंबईत तीव्र आंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला. दोन तास झालेले हे आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले. यावेळी आलेल्या रुग्णवाहिकांना तातडीने वाट करून देत आंदोलकांनी पुन्हा एकदा आपली शिस्त दाखवून दिली. आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या होत्या. शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही़, कायद्याच्या चौकटीत बसेल अशा स्वरूपाचे आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान केडगाव चौफुला येथे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आंदोलन करण्यात आले. नगर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात झालेले आंदोलन शांततेत पूर्ण झाले. आंदोलन झाल्यानंतर शहरातील सर्व आगारातून बस मार्गस्थ करण्यात आल्या.