शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा, मुस्लिमांना आरक्षण लागू

By admin | Updated: July 10, 2014 02:48 IST

शिक्षण आणि नोक:यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याच्या वटहुकुमावर राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बुधवारी स्वाक्षरी केली.

मुंबई : शिक्षण आणि नोक:यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याच्या वटहुकुमावर राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 
राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. राज्यपालांनी सही केलेला वटहुकूम येत्या एक-दोन दिवसांत राजपत्रत अधिकृत प्रसिद्ध केला जाईल, असे ते म्हणाले. 
राज्यपालांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या वटहुकुमाची मुदत सहा महिने असते आणि त्याच्या आधी विधिमंडळाने त्याचे रूपांतर कायद्यामध्ये करणो आवश्यक असते. वटहुकुमाची अंमलबजावणी तत्काळ होत असते हे लक्षात घेता, आता मराठा व मुस्लीम आरक्षण लागू झाले आहे. तसेच सहा महिन्यांर्पयत या वटहुकुमाची मुदत लक्षात घेता  विधिमंडळ त्याचे कायद्यात रूपांतर करू शकले नाही तरी सुद्धा ऑक्टोबरमध्ये होणा:या विधानसभा निवडणुकीच्या काळात आरक्षण लागू असेल. त्यामुळे या आरक्षणांचा राजकीय फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितपणो होणार आहे. 
शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी विद्यापीठातील व पशुवैद्यकीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी आणि शासकीय, निमशासकीय नोक:यांमध्ये सरळसेवा भरतीसाठी हे आरक्षण लागू राहणार आहे. 
मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या 25 जून रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या दोन्ही आरक्षणांमध्ये उत्पन्न मर्यादा (क्रिमीलेअर) असेल हे शासनाने आधीच स्पष्ट केले आहे. राज्यात आधीच 52 टक्के आरक्षण असून, नव्या 21 टक्के आरक्षणामुळे आता एकूण टक्केवारी 73 इतकी झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)
 
सुनावणी तहकूब
तत्पूर्वी, मराठा आरक्षणाचा 
वटहुकूम लवकरच काढला जाईल, अशी माहिती अॅडव्होकेट जनरल 
डी़ ज़े खंबाटा यांनी दिल्यानंतर यासंबंधीच्या दोन जनहित याचिकांवरील सुनावणी दोन अठवडय़ांसाठी तहकूब केली.या आरक्षणाविरोधात केतन तिरोडकर व अॅड़ गुणरत्न सदावर्ते यांनी दोन स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या आहेत़ बुधवारी तिरोडकर गैरहजर होत़े त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, तसे पत्र तिरोडकर यांनी न्यायालयाला दिले. मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊ, असे अॅडव्होकेट जनरल यांनी स्पष्ट केले.