शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उत्खननाचा ‘प्रसाद’ अनेकांनी चाखला

By admin | Updated: February 2, 2015 23:55 IST

कोट्यवधीचे नुकसान : जागा देवस्थानची, रॉयल्टी ‘महसूल’ कडे, दराचा तर पत्ताच नाही

इंदुमती गणेश- कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ६००० एकर जमिनीचा ताळमेळ लागत नसला तरी जी उपलब्ध आहे त्यातील उत्खननासाठी दिलेल्या जमिनींच्या रॉयल्टीचा ‘प्रसाद’ ही महसूल खात्यालाच मिळत आहे. याबाबत देवस्थान समिती आणि शासन  असा वाद सुरू आहे. मात्र, या वादात महसूल विभागाच्या कांही अधिकाऱ्यांनी व त्या-त्या काळातील समितीतील जबाबदार माणसांनी उत्खननाचा ‘प्रसाद’  चांगलाच चाखला आहे. देवस्थानला मात्र यातील दमडीही मिळालेला नाही. लेखापरिक्षक बी. एस. शेवाळे यांनी सन २००६-०७ साली केलेल्या शेवटच्या लेखापरीक्षणानुसार गेली वर्षानुवर्षे रॉयल्टीच्या उत्पन्नाची ऋप्रत्यक्ष वसुलीच झालेली नसल्याने संंस्थेचे आतापर्यंत चार ते पाच कोटींच्या रकमेचे आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. अजूनही हे प्रकरण ‘जैसे थे’ आहे. शासनाच्या विधि व न्याय खात्यानेदेखील समितीची फसवणूक होत असल्याचा अहवाल दिला आहे.  देवस्थान समितीच्या शाहूवाडी तालुक्यातील मौजे उदगिरी व कासार्डे या ठिकाणी बॉक्साईट उत्खनन केले जाते. स्वाती मिनरल्स, पीएजी माईन्स, युनिव्हर्सल माईन्स, पद्मावती माईन्स अशा कंपन्यांसोबत उत्खननाचा करार करण्यात आला.  सन २००८ नंतर कासार्डे येथे पद्मावती मायनिंग या कंपनीला मुदतवाढ तसेच ए. व्ही. माईन्स या कंपनीशी करार करण्यात आले. मात्र, समितीनेच दिलेल्या माहितीनुसार या कामात दरच ठरविण्यात आले नाहीत. उत्खननाची रॉयल्टी सरकारसोबत देवस्थानला मिळणे अपेक्षित असतानाही ही सगळी रक्कम महसूल विभागाकडे भरली जाते. वार्षिक करारानुसार सदरच्या रकमा  वेळच्या वेळी तलाठ्यांकडून  भरल्या जाणे आवश्यक असताना  कासार्डे येथील सन १९८५ ते १९९५ या दहा वर्षांच्या कालावधीतील १०  लाख ५९ हजार ५६४ इतकी  रक्कम तलाठ्याने एकदम भरली. सन १९८५ पूर्वी उत्खनन केले जात होते का? असल्यास रॉयल्टीच्या रकमेचे काय, हे प्रश्न उपस्थित होतात. तसेच १९९५ ते २००५ या दहा वर्षांच्या कालावधीतील कोणत्याच नोंदी यापूर्वीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिलेल्या अहवालात नाहीत; त्यामुळे या कालावधीत उत्खनन चालू होते की नाही, हे स्पष्ट होत नाही.रॉयल्टीची रक्कम समितीला मिळावी यासाठी आधी शासनाकडे दावा चालू होता, आता तो न्यायालयाकडे वर्ग झाला आहे. आजतागायत ही रक्कम जवळपास चार ते पाच कोटींपर्यंत जाते. देवस्थानचे नुकसान टाळण्यासाठी या प्रकरणाचा निकाल लागणे किती निकडीचे आहे, याची नोंद घ्यावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. लेखापरीक्षणात स्वाती मिनरल्स, युनिव्हर्सल मायनिंग, पद्मावती मायनिंग या कंपन्यांनी रॉयल्टीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात भरणा केल्याचे समितीकडून सांगण्यात आले; पण त्याबाबतचा कोणताही तपशील, दस्तऐवज समितीकडे नाही. जे काही व्यवहार होतात, ते महसूल विभाग आणि संबंधित कंपन्यांत; त्यामुळे समितीकडे याची कोणतीच माहिती नाही असे नमूद करण्यात आले; त्यामुळे या रॉयल्टी प्रकरणात पाणी मुरतंय हे नक्की. भुईभाडे, शाळांची थकबाकी पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज, आजरा, कागल, शाहूवाडी, राधानगरी, शिरोळ या तालुक्यांमधील जागा जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी वर्षाकाठी चारशे, सहाशे रुपयांनी देण्यात आल्या आहेत. ही रक्कमदेखील वर्षानुवर्षे वसूल झालेली नाही. समितीच्या वतीने भुईभाड्याचा २ वर्षे ११ महिन्यांचा करार केला जातो. प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे या जमिनी भाडेकरूंकडेच आहेत. नाममात्र असलेले भुईभाडेही वर्षानुवर्षे थकीत आहे. देवस्थानने केलेल्या खुलाशात वर्षाला ४५ हजार रुपये रक्कम भुईभाड्यातून येत असल्याचे सांगण्यात आले. हे ग्राह्य धरले तरी १७ हजार एकर जागेसाठी फक्त ४५ हजार रुपये भुईभाडे म्हणजे न पटणारी बाब आहे.