शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकांच्या आमिषाने अनेकांना लाखोंचा गंडा

By admin | Updated: April 17, 2017 03:15 IST

भिवंडीच्या कशेळी आणि काल्हेर परिसरांत अल्पदरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ ते दहा जणांकडून प्रत्येकी लाखो रुपये उकळणाऱ्या

ठाणे : भिवंडीच्या कशेळी आणि काल्हेर परिसरांत अल्पदरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ ते दहा जणांकडून प्रत्येकी लाखो रुपये उकळणाऱ्या सरोजकुमार बहादूर सिंग (४२) याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या आणखी एका साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.बांधकाम व्यावसायिकांकडे काही कामे करीत असल्यामुळे माझी त्यांच्याकडे चांगली ओळख आहे. काल्हेर व कशेळी भागांत सदनिका बुक केल्यास मोठी सवलत देतो. उर्वरित रक्कम सुलभ हप्त्याने भरा, अशी बतावणी करीत वेगवेगळ्या लोकांकडून सरोजकुमारने दीड लाखांपासून ते सात लाखांपर्यंत पैसे गोळा केले. त्यांना सदनिका किंवा पैसेही न देता नंतर मात्र नॉट रिचेबल झाला. लोकमान्यनगर भागात तो आल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि हवालदार भूषण गावडे यांच्या पथकाने त्याला १४ एप्रिल रोजी अटक केली. त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.सावरकरनगर भागातील नयनेश मोदी यांनाही कशेळी भागात सदनिका देण्याचे आमिष दाखवून मार्च २०१२ मध्ये त्यांच्याकडून त्याने सात लाख रुपये घेतले. याप्रकरणी त्यांनी त्याच वेळी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सावरकरनगर भागातील अनिल गुप्ता यांच्याकडूनही १८ लाखांमध्ये वन बीएचके सदनिका बुकिंग करण्याच्या नावाखाली एक लाख ५१ हजार रुपये त्याने घेतले होते. तर, शीतलाप्रसाद जयस्वाल यांच्याकडून नऊ लाखांची वन बीएचके सदनिका बुकिंगसाठी २०१३ मध्ये दोन लाख रुपये त्याने घेतले. धनादेश आणि आरटीजीएसद्वारे रक्कम स्वीकारून लोकांना त्याने रीतसर पावत्याही दिल्या. त्यामुळेच कोणालाही त्याच्यावर किंवा त्याच्या साथीदारांवर संशय आला नाही. (प्रतिनिधी)