शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मिनीट्रेनच्या मार्गात अनेक अडथळे

By admin | Updated: May 1, 2017 06:43 IST

नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा नॅरोगेज ट्रॅकवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत

कर्जत : नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा नॅरोगेज ट्रॅकवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी दुरु स्तीची कामे सुरू असून मागील पावसाळ्यात मिनीट्रेन बंद असल्याने डोंगरातील माती आणि दगड हे मोठ्या प्रमाणात नॅरोगेज ट्रॅकवर येऊन थांबले आहेत. त्यामुळे मिनीट्रेन सुरू करण्याचे प्रयत्न सुरूअसताना प्रामुख्याने वॉटर पाइपपासून पुढे माथेरानकडे मिनीट्रेन पोहोचण्यासाठी असंख्य अडथळे दिसून येत आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेन पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी ठरावीक उद्दिष्ट ठरवून घेतल्यास फायद्याचे ठरू शकेल.नेरळ-माथेरान मिनीट्रेन हे माथेरानचे हृदय आहे, अशावेळी मिनीट्रेन बंद असेल तर माथेरानचे पर्यटन धोक्यात येते हे ९ मे २०१६ पासून माथेरानकर अनुभवत आहेत. त्यामुळे सर्व माथेरानकर मिनीट्रेन पुन्हा व्हावी म्हणून प्रार्थना करीत आहेत. रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेनच्या ताफ्यात तीन नवीन इंजिने आणली असल्याने पर्यटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु मे २०१६मध्ये मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेन सुरू व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न थांबविले होते. मात्र, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी सातत्याने आवाज उठविल्याने नेरळ माथेरान मिनीट्रेनचा विषय जिवंत राहिला आहे. जानेवारी २०१७ मध्ये मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक नेरळ येथे स्थानकाच्या पाहणीसाठी आल्यानंतर मिनीट्रेन ३१ मे २०१७ पूर्वी नॅरोगेज ट्रॅकवर येणार, असे आश्वासन दिले आहे. मिनीट्रेनच्या नेरळ-माथेरान या २० किलोमीटरच्या मार्गात प्रामुख्याने घाट सेक्शन असलेल्या ठिकाणी म्हणजे वॉटर पाइपपासून अमन लॉज या भागात मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर दरडी कोसळल्या होत्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी मिनीट्रेन बंद झाल्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत नॅरोगेज ट्रॅकचे कोणतेही दुरु स्तीचे काम केले नसल्याने मिनीट्रेन सुरू होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मागील महिन्यात नॅरोगेज ट्रॅकवर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दुरु स्तीचे काम सुरू केले आहे. एकावेळी नेरळपासून जुम्मापट्टीपर्यंत आणि अमन लॉजपासून माथेरानपर्यंत अशा दोन भागात म्हणजे १० किलोमीटर भागात दुरु स्तीची कामे करण्यात येत आहेत. ही कामे करताना आवश्यकतेनुसार रूळ बदली करणे, ट्रॅकवर आलेले दगड, माती बाजूला काढणे आदी कामे सुरू आहेत.२० किलोमीटरच्या नेरळ-माथेरान नॅरोगेज ट्रॅकवर सर्वाधिक खराब ट्रॅक हा अमन लॉजपासून वॉटर पाइपपर्यंत भागात ट्रॅक अनेक ठिकाणी दिसेनासा झाला आहे. त्या भागात रेल्वेने दुरु स्तीचे काम पावसाळ्यात आणि आजदेखील सुरू केले नसल्याने मिनीट्रेन माथेरानला कशी पोहोचणार? असा प्रश्न आहे. या भागात अनेक ठिकाणी मोठे दगड रु ळावर आले आहेत, माती-दगडांनी ट्रॅक गाडले गेले आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या दगडांनी रेल्वे मार्गाची दिशा बदलली आहे. काही भागात रूळ वाकडे झाले आहेत ही सर्व कामे रेल्वेने आजच्या तारखेपर्यंत सुरू केली नाहीत. दुसरीकडे पावसाळ्यात दरवर्षी नॅरोगेज ट्रॅकवर या भागात अशाच प्रकारे पाऊस जास्त असेल तर दगड माती वाहून येत असते. त्या स्थितीत नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा नॅरोगेज ट्रॅकवर येण्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात कामगार या मार्गावर लावण्याची गरज आहे. त्यांना वेळ निश्चित करून काम दिल्यास मिनीट्रेन पुन्हा ट्रॅकवर येण्यास मदत होऊ शकते. मागील वर्षभरात तीन नवीन इंजिने रेल्वेने मिनीट्रेनच्या ताफ्यात आणली आहेत, मिनीट्रेन पुन्हा ट्रॅकवर येऊन माथेरानचे पर्यटन पुन्हा बहरणे गरजेचे आहे. (वार्ताहर) मिनीट्रेन बंदने पर्यटकांचा हिरमोडजीवनात ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीशी नाते दृढ झाल्यावर त्या व्यक्तीचा विरह कदापि सहन होत नाही त्याचप्रमाणे १९०७ सालापासून नेरळ -माथेरान या मिनीट्रेनशी पर्यटकांचे नाते घट्ट बनले आहे. येथे मिनीट्रेनच्या माध्यमातून निसर्गसौंदर्याची, शुद्ध हवेची अन् एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा आभास होण्यासाठी नियमित पर्यटक येथे येत आहेत; परंतु वर्षभरापासूनच शुल्लक कारणावरून मिनीट्रेन सेवा बंद करण्याच्या कठोर निर्णयाने पर्यटन व्यवसायाला फटका तर बसलाच मात्र पर्यटकांची निराशा झाली आहे.अनेकदा स्थानिक राजकीय मंडळींनी संबंधित अधिकारी, मंत्री यांच्या मुंबई, दिल्ली येथे जाऊन समक्ष भेटी घेऊन निवेदने दिलेली आहेत. मात्र, या सरकारला काही केल्या पाझर फुटत नाही. मागील वर्षापासून ट्रेन आज सुरू होईल, उद्या होईल, याच आशेवर स्थानिकांना ठेवून रेल्वे प्रशासन चाल-ढकल करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून के ला जात आहे. राज्यात वर्षभरात कुठे ना कुठे, रेल्वेगाड्यांचा अपघात होतच आहे, म्हणून काय त्या नियमित सेवा प्रशासन बंद करीत नसून युद्धपातळीवर कामे होत आहेत. मग येथेही तत्परतेने सेवा पुरवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आम्ही येतो माथेरानला फक्त मिनीट्रेनमधून सफर करण्यासाठी येतो. आमच्या मुलांना मिनीट्रेनमधून घाट मार्गातील विहंगम दृश्य आणि निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या माथेरानला भेट देण्यासाठी; पण ही ट्रेन बंद असल्याने आमचा पुरता हिरमोड झाला आहे. लवकरच ही सेवा सुरळीत व्हावी हीच अपेक्षा. - चंद्रशेखर कुलकर्णी, पर्यटक पुणे आम्ही आमच्या परीने, तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाने सध्या इथे रेल्वे मार्गाच्या दुरु स्तीचे काम सुरू असून अल्पावधीतच शटल सेवा पर्यटकांच्या दिमतीला धावणार आहे. दुरु स्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. नगरपरिषदेकडून ही रेल्वे सेवा लवकर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रस्ताव रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराला दिला आहे.- प्रसाद सावंत, गटनेता, माथेरान नगरपरिषद अमन लॉज-वॉटर पाइप हा संपूर्ण भाग डोंगराळ असल्याने तेथे पावसाळी वातावरणात ट्रॅकवर दगड माती वाहून येणे नित्याचे असते. पावसाळ्यात प्रवासी वाहतूक जरी बंद असली तरी नॅरोगेज ट्रॅकवरून मालवाहू गाडी पावसाळ्यातदेखील सुरू असते. त्या वेळी रु ळावर आलेली दगड, माती तत्काळ हटविली जायची; परंतु मार्ग बंद असल्याने पावसाळ्यात वाहून आलेली माती, दगड आजही कायम आहेत. ते हटविण्यासाठी आणि ट्रॅक सुस्थितीत करण्यासाठी १५ दिवस पुरेसे आहेत. - राजाराम खडे, निवृत्त मोटरमन