शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यापासून खतनिर्मिती

By admin | Updated: July 15, 2017 01:31 IST

घनकचरा व्यवस्थापनासाठी इंदापूर नगरपरिषदेने प्रक्रिया केंद्राची उभारणी केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : घनकचरा व्यवस्थापनासाठी इंदापूर नगरपरिषदेने प्रक्रिया केंद्राची उभारणी केली आहे. तेथे कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत कचरा साठवण्याकरिता शहरवासीयांना डस्टबीन देण्यात येणार आहेत.या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी सांगितले की, इंदापूर शहरात प्रत्येक दिवशी सरासरी आठ ते नऊ टन कचरा गोळा होतो. तो गोळा करणे व त्याचे विलगीकरण करण्याचा ठेका सहा -सात महिन्यांपूर्वी एका खासगी संस्थेला देण्यात आला आहे. शहरातील सर्व्हे नंबर १९७ मध्ये हा कचरा जमा केला जात आहे. तेथेच ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येत आहे. याच जागेत कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तेथे कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे.घराच्या पातळीवर कचऱ्याचे विलगीकरण झाले तर घनकचरा व्यवस्थापन सोपे होणार आहे. त्यासाठी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या सूचनेनुसार येत्या पंधरा दिवसांत नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना दोन वेगवेगवेगळ्या रंगाची डस्टबिन देण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्याधिकारी म्हणाले की, एकामध्ये सुका व एकात ओला कचरा साठवून नगरपरिषदेची घंटागाडी दाराशी आल्यानंतर तो कचरा त्या गाडीत द्यायचा आहे.शहरातील काही प्रभागांमध्ये नगरपरिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागा आहेत. त्या जागा कचरा व्यवस्थापनासाठी वापरात आणण्याचे नियोजन आहे. स्थानिक नागरिकांनी कचऱ्याचे विलगीकरण करुन तो या जागेत जमा करावा. नगरपरिषदेनंतर त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्टेवाट लावेल. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात येणार आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारांनी वैद्यकीय कचऱ्याची त्यांच्या परीने विल्हेवाट लावावी. तो नेण्यास नगर परिषद बांधील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळा ढवळे यांनी वेळोवेळी निदर्शने करून शासनाकडे दाद मागितली आहे. मात्र, तेथे सभोवती संरक्षक भिंत उभारुन नगरपरिषदेने प्रक्रिया केंद्र उभारले आहे. सन २०१४ मध्ये इंदापूर नगर परिषदेने १७ लाख रुपये खर्चून सरडेवाडीजवळ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी जमीन घेतली होती. हा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक असणारी परवानगी नगर परिषदेने घेतली नाही. त्यानंतर सॅटेलाइट सर्वेक्षण झाले. त्या वेळी तेथे मनुष्यवस्ती असल्याचे आढळल्याने शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी ती जमीन दिली नाही. झोपड्यांमुळे त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारता आला नाही.