शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारण्यात फुंडकर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:22 IST

महाराष्ट्रातील नवीन सरकारातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडता सर्वच मंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीस शतप्रतिशत उपस्थित राहिले नसून, कृषिमंत्री

मुंबई : महाराष्ट्रातील नवीन सरकारातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडता सर्वच मंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीस शतप्रतिशत उपस्थित राहिले नसून, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर दांडी मारण्यात अव्वल असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्य सचिव कार्यालयाने दिली आहे. पाच टॉप दांडीबहाद्दर मंत्र्यांमध्ये फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो.अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठका आणि मंत्र्यांच्या उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी केळकर यांनी गलगली यांस कळविले की, १७ जुलै २०१६ पासून २२ मे २०१७ या कालावधीत मंत्रिमंडळाच्या ३५ बैठका झाल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता सर्व २२ मंत्र्यांनी कधी ना कधी दांडी मारल्याचे समोर आले आहे. फुंडकर हे ३५ पैकी ११ वेळा अनुपस्थित होते. वित्तमंत्री मुनगंटीवार आणि ऊर्जामंत्री बावनकुळे या दोघांनीही ९ वेळा अनुपस्थित राहून दुसरा क्रमांक पटकावला. पंकजा मुंडे, राजकुमार बडोले आणि संभाजी निलंगेकर-पाटील हे तिघे प्रत्येकी ८ वेळा अनुपस्थित होते. ग्राहक सरंक्षणमंत्री गिरीश बापट आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता हे दोघे ७ वेळा अनुपस्थित होते. जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम हे ६ वेळा अनुपस्थित होते.यांचीही अनुपस्थितीसहकारमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबन लोणीकर हे ५ वेळा अनुपस्थित होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे प्रत्येकी ४ वेळा तर पर्यटनमंत्री जयकुमार रावळ ३ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन २ वेळा अनुपस्थित होते. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर एकदा अनुपस्थित होते.