शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचा मनपावर मोर्चा

By admin | Updated: June 30, 2016 02:49 IST

महापालिकेने अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

नवी मुंबई : महापालिकेने अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत पदपथांवरील फेरीवाले व बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या वतीने बुधवारी महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात फेरीवाल्यांसह शहरातील झोपडीधारकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील मार्जिनल स्पेस व फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरातील पदपथांनी मोकळा श्वास टाकला आहे. असे असले तरी फेरीवाल्यांचे कोणतेही नियोजन न करता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप फेरीवाला संघटनेने केला आहे. कारवाई करण्यापूर्वी फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे आवश्यक होते, असेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच पावसाळ्यात निवासी घरांवर कारवाई करणे गैर आहे. असे असतानाही अनेक ठिकाणच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या सर्वांचा विरोध करण्यासाठी बुधवारी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय होईपर्यंत त्यांच्यावर कारवाई करू नये, कारवाईत जप्त केलेला माल संबंधित फेरीवाल्यांना परत द्यावा, पावसाळ्यात झोपड्यांवरील कारवाई थांबवावी आदी मागण्या मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आल्या. कामगार नेते प्रफुल्ल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख हरिभाऊ म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, महिला संघटक रंजना शिंत्रे आदींचा सहभाग होता. दरम्यान, मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त सुहास शिंदे व सह आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाही न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)