शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज म्हात्रेंच्या अंगरक्षकाला अटक

By admin | Updated: February 25, 2017 23:22 IST

भिवंडी महापालिकेचे काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केल्याने कथित आरोपींची संख्या आता तीन झाली

ठाणे : भिवंडी महापालिकेचे काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केल्याने कथित आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. तर अटक केलेला जिग्नेश अरविंद पटेल हा म्हात्रे यांचा अंगरक्षक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या हत्येसाठी मारेकऱ्यांना लाखो रुपये मिळणार असल्याचेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.मनोज म्हात्रे यांची हत्या त्यांचा पुतण्या प्रशांत म्हात्रे याने केली असण्याची शक्यता वर्तवली जात असताना, या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र, ते अद्याप मुख्य आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यातच राजकीय हस्तक्षेपाने पोलिसांवर दबाव वाढल्याने या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.या पथकाचे प्रमुख एन.टी. कदम यांच्या पथकाने तपास करताना, तांत्रिक माहितीच्या आधारावर जिग्नेश पटेल याला ताब्यात घेतले. त्या वेळी तो मनोज म्हात्रे यांचा अंगरक्षक असल्याची बाब पुढे आली. तसेच हत्येचा कट शिजताना, जिग्नेश हा मारेकऱ्यांसोबत असल्याचे पुढे आले. तसेच हत्येच्या दिवशी जिग्नेशने सहा तास आधी मारेकऱ्यांसोबत दारू आणि जेवणही केले होते. तसेच म्हात्रे यांची हत्या झाली त्या वेळी मागील १० ते १२ वर्षांपासून अंगरक्षक असलेला जिग्नेश हा त्यांच्यासोबत असणे आवश्यक होते. मात्र, तो म्हात्रेंसोबत नसताना प्राणघातक हल्ला झाला. तसेच त्यानेच मारेकऱ्यांना म्हात्रे यांच्याबाबत माहिती दिली असून त्याबदल्यात त्याला मोठा मोबदला मिळणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणाची सूत्रे हाती घेतल्यावर मारेकऱ्यांच्या मागावर पथक दमणला पोहोचले खरे, पण मारेकऱ्यांना पकडण्यापूर्वीच त्यांनी तेथून पळ काढला. तर या हत्येत १० ते १२ जण असण्याची शक्यता असून ही हत्या नियोजन करून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी) अटक केलेला जिग्नेश हा म्हात्रे यांचा अंगरक्षक असून या हत्येबाबत त्याला माहिती असल्याचे पुढे आले आहे. तसेच त्याला न्यायालयाने १० दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. - पराग मनेरे, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर