शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जैनसह तिघांची जामिनासाठी धाव

By admin | Updated: June 22, 2016 04:07 IST

इफेड्रीन तस्करी प्रकरणी अटकेत असलेला एव्हान लाईफ सायन्सेसचा मुख्य संचालक मनोज जैन, राजेंद्र डिमरी, बाबा धोतरे या तिघांनी जामीनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली

ठाणे : इफेड्रीन तस्करी प्रकरणी अटकेत असलेला एव्हान लाईफ सायन्सेसचा मुख्य संचालक मनोज जैन, राजेंद्र डिमरी, बाबा धोतरे या तिघांनी जामीनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली. पकडलेला साठा हा दोन हजार कोटींचा नसून पोलिसांनी हा आकडा फुगवलेला आहे. तसेच इफे ड्रीनच्या रासायनिक तपासणीतही अंमली पदार्थ आढळले नसल्याचा दावाही त्यांच्या वकीलांनी न्यायालयात केला. तर सुशिल सुब्रमण्यम या आणखी एका फरारी आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. या सर्व अर्जांवरील सुनावणी आता सोमवारी होणार आहे.ठाण्याचे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात आरोपींचे वकील अ‍ॅड. एन. एम. मोटे यांच्यासह तीन वकिलांनी त्यांची बाजू मांडली. एव्हॉन लाईफसायन्सेस लि. ही कंपनी नोंदणीकृत असून त्यांच्याकडे इफे ड्रीन बनविण्याचा परवान्यासह केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर, अन्न व औषध प्रशासन यांचे परवाने आहेत. शिवाय, ठाणे पोलिसांनी या कंपनीत छापा टाकून हस्तगत केलेले इफे ड्रीन हे दोन हजार कोटींचे नाही. पोलिसांनी हा आकडा फुगवलेला आहे. ते दोन ते चार हजार प्रति किलोने विकले जात असून त्याची एकूण किंमत पाच ते सहा कोटींच्या घरात आहे. याशिवाय, टीएलसी तपासणी अहवालात ०.४५ इतक्याच प्रमाणात इफे ड्रीन मिळाले. तर आणखी एका तपासणीत त्याचे प्रमाण केवळ ०.०५ इतके आहे. कंपनीचा व्यवस्थापक या नात्यानेच सर्व कायदेशीर जबाबदारी मनोज जैन यांनी पार पाडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर इफे ड्रीनचा माल गुजरातला पाठविण्यासाठी धोतरेची मदत घेतल्यामुळे त्याला अटक केली. मात्र, जो टेम्पो पोलिसांनी या कारवाईत दाखविला तो धोतरेच्या मालकीचा नसल्याचाही दावा करण्यात आला. शिवाय, इफे ड्रीनच्या इतरकाही प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी आरोपींना जामीन दिल्याचाही हवाला देऊन आपल्याही जामीन देण्याची मागणी केली. अर्थात, कंपनीतून इफे ड्रीनच हस्तगत केले असून त्यापासून वेगवेगळे अंमली पदार्थ बनविले जात असल्याचा दावा पोलिसांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)