शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मंजुळा शेट्ये प्रकरण; हत्येची महिला आयोगाकडून दखल

By admin | Updated: June 28, 2017 02:17 IST

भायखळा महिला कारागृहात मंजुळा शेट्ये हिला तुरुंग प्रशासनाने विवस्त्र करून अमानुष मारहाण केली. त्यातच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळा महिला कारागृहात मंजुळा शेट्ये हिला तुरुंग प्रशासनाने विवस्त्र करून अमानुष मारहाण केली. त्यातच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला, या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल राज्य महिला आयोगाने मंगळवारी घेतली. महिला आयोगाने मंजुळाच्या हत्येप्रकरणी सुमोटो दाखल करत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशी अहवालासह २९ जूनला हजर राहण्याचे आदेश अप्परपोलीस महासंचालक (कारागृह) यांना मंगळवारी देण्यात आले. अंडी व पावाच्या हिशेबावरून मंजुळाला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी सविस्तर वृत्त दिले. त्यानंतर राज्य महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोग प्रकरणाचा स्वतंत्र तपास करणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, सकृतदर्शनी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. मंगळवारी सुमोटो दाखल करून घेण्यात आली आहे. प्रकरणाची कागदपत्रे, चौकशी अहवाल घेऊन २९ तारखेला हजर राहण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) भूषणकुमार उपाध्याय यांना देण्यात आले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांच्या आधारे तपास केला जाणार आहे. गरज भासल्यास अन्य साक्षीदारांनाही चौकशीस बोलाविण्यात येणार आहे.‘लोकमत’च्या वृत्तानंतर आदेशमंजुळावरील अत्याचाराबाबत तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून ‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडली. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) भूषण कुमार उपाध्याय यांना चौकशी अहवालासह २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले. राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव मंजुषा सुभाष मोळवणे यांनी पाठवलेल्या पत्रात तसा उल्लेख आहे.