शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण : तपास अधिकाऱ्यांचे आरोपींना सहकार्य?

By admin | Updated: July 6, 2017 04:31 IST

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाच्या तपासासाठी कारागृहाच्या वतीने कारागृह विभागाच्या पोलीस उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांची नेमणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाच्या तपासासाठी कारागृहाच्या वतीने कारागृह विभागाच्या पोलीस उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कारागृहाच्या स्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली असताना, कारागृहाच्या व्हॉट्सप ग्रुपवर त्या स्वत: अन्य कर्मचाऱ्यांना आरोपींना सहकार्य करण्याची मागणी करत असल्याचा प्रताप त्यांच्याच ग्रुपमधील अधिकाऱ्याने चव्हाट्यावर आणला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहाच्या जेलर पीएसआय मनीषा पोखरकर, अंमलदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांना अटक करण्यात आली असून त्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. या हत्याप्रकरण तसेच कारागृहातील दंगली प्रकरणी दोन सविस्तर गुन्हे नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या अधिक तपासासाठी कारागृहाच्या वतीने पोलीस उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांची राज्य महिला आयोगाने नेमणूक केली होती. तसेच राज्यभरातील महिला कैद्यांची काय परिस्थिती आहे? याचाही अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पण महाराष्ट्र कारागृहाच्या व्हॉट्सप ग्रुपवर त्या आरोपींना सहकार्य करण्याची मागणी करत आहेत.याबाबत ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी त्यांचा हा प्रताप चव्हाट्यावर आणला आहे. याचा स्नॅप शॉटसहीत तक्रार अर्ज त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, साठे या अन्य कर्मचाऱ्यांना आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून आरोपींसाठी हजार आणि पाचशे रुपये गोळा करत असल्याची तक्रार त्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांसह तुरुंग प्रधान सचिव आणि कारागहाचे अप्पर पोलीस महासंचालक बी.के उपाध्यय यांना याबाबत तक्रार केली आहे. याबाबत स्वाती साठे यांच्यासह कारागृहाचे अप्पर पोलीस महासंचालक बी. के. उपाध्यय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. काय म्हटले आहे ग्रुपवरमहाराष्ट्र कारागृहाच्या व्हॉट्साप ग्रुपवर, स्वाती साठे यांनी, ‘आपल्या सहाही कर्मचाऱ्यांना अटक झाली असून त्यांना ७ तारखेपर्यंतची कोठडी सुनावली आहे. आतातरी या माध्यमांचा आत्मा शांत होईल का?’ असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय यावर कोणी उत्तर दिले नाही म्हणून त्यांनी, आपण सगळे जेलकर्मीअधिकारी आणि कर्मचारी भक्कम आधार देऊ आपल्या भगिनींना, प्लीज हेल्प आॅल’ तसेच अरे इतक्या लोकांनी वाचले किमान येस तरी म्हणा...असा मेसेज त्यांनी ग्रुपवर केला आहे.