शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंजुळा शेट्ये प्रकरणी सरकारला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:39 IST

मंजुळा शेट्येचा मृत्यू ‘अपघाती’ आहे, हे दाखविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणा-या राज्य सरकारला सोमवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले.

मुंबई: मंजुळा शेट्येचा मृत्यू ‘अपघाती’ आहे, हे दाखविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणा-या राज्य सरकारला सोमवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. कोठडी मृत्यूप्रकरणी कायद्यानुसार, २४ तासांत दंडाधिकाºयांकडे चौकशीसाठी पाठविणे आवश्यक आहे. मात्र, या केसमध्ये ही प्रक्रिया आठवडाभर उशिराने सुरू झाली, असे म्हणत, उच्च न्यायालयानर तपास यंत्रणेला केससंबंधी सर्व कागदपत्रे दंडाधिका-यांकडे जमा करण्याचा आदेश दिला, तर दंडाधिकाºयांना चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, यासाठी समाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) कलम १७६ (१) (ए), (३) आणि (४) नुसार, कोठडी मृत्यू झाल्यानंतर संबंधित प्रकरण चौकशीसाठी २४ तासांत दंडाधिकाºयांकडे पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी ही कायदेशीर प्रक्रिया विलंबाने पार पाडण्यात आली. घटना २३ जूनची आहे.२४ जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आणि ६ जुलै रोजी दंडाधिका-यांना चौकशी करण्यासंबंधी प्रस्ताव पाठविण्यात आला? कायदेशीर प्रक्रिया पार पाडली का? कलम १७६ (१) (ए), (३) आणि (४)चे पालन केलेत का? क्राइम ब्रँच जे झाले त्याचे समर्थन करत आहे, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.हे सर्व जाणूनबुजून करण्यात येत आहे. दंडाधिका-यांनी कागदपत्रे मागूनही त्यांना केवळ एफआयआर आणि शवविच्छेदन अहवाल देण्यात आला.अन्य कागदपत्रे दिलेली नाही, असे म्हणत, न्यायालयाने तपास यंत्रणेला सर्व कागदपत्रे दंडाधिकाºयांना देण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे, दंडाधिकाºयांना चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश देत, या याचिकेवरील पुढील सुनावणी २१ आॅगस्ट रोजी ठेवली.