शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

आंब्याच्या मोहापायी महिलेने गमावला जीव

By admin | Updated: April 25, 2015 09:37 IST

आंब्याच्या मोसमात आंबा खाण्याच्या हौसेला ४४ वर्षीय महिला आवर न घालू शकल्याने या महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी कांजूरमध्ये

मुंबई : आंब्याच्या मोसमात आंबा खाण्याच्या हौसेला ४४ वर्षीय महिला आवर न घालू शकल्याने या महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी कांजूरमध्ये घडली. ही महिला आंबा खाण्यासाठी झाडावर चढली. आंबा तोडण्याच्या प्रयत्नात आंबा हातात न लागता तोल जाऊन ती पडली आणि या घटनेत या महिलेचा अंत झाला. कांजूर येथील सीजीएस वसाहतीत तारुण हरिष मकवाना (४४) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. आंबा खाण्याच्या इच्छेला मकवाना स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. दुपारी एकच्या सुमारास घरामागे असलेल्या झाडाला लगडलेले आंबे त्यांनी पाहिले. लहान मुलांना झाडाखाली उभे करून त्या स्वत: झाडावर चढल्या. आंबा हाती न लागता पाय घसरून त्या इमारतीच्या आधार भिंतीवर कोसळल्या. तेव्हा आधार भिंतीवरील लोखंडी ग्रीलच्या सळ्यांमध्ये अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची वर्दी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सळीतून मकवाना यांचा मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मकवाना यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांंच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कांजूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करीत अधिक तपास सुरू असल्याची माहिती कांजूर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)