शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

आंब्याची आवक वाढली, मात्र दर गडगडले; वाशी बाजारातून परदेशात निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 08:41 IST

दररोज १ लाख पेट्या दाखल, हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे.

रत्नागिरी : वाढत्या उष्णतेमुळे आंबा तयार होऊ लागला असून, काढणी प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. जिल्ह्यातील बागायतदारांची वाशी बाजारावरच अधिक भिस्त असल्याने तेथील आवक वाढली आहे. कोकणातून दररोज ७० ते ७५ हजार पेट्या वाशी बाजारात जात आहेत. त्याचवेळी कर्नाटक राज्यातून २५ हजार आंबा पेटी विक्रीसाठी येत असल्यामुळे लाखभर पेट्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही आवक वाढल्याने आता दर कमी आला असून, एका पेटीला बाराशे ते तीन हजार रुपये आकारले जात आहेत.

हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. अवकाळी पावसातून बचावलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मोहराचा आंबा मार्चपासून बाजारात आला. मात्र, तिसऱ्या टप्प्यात अति थंडीमुळे परागीकरणाअभावी फळधारणा झालीच नाही. आता चाैथ्या टप्प्यातील मोहराचा आंबा तयार होत असून, तो बाजारात येऊ लागला आहे. मात्र, हा आंबा बाजारात येण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. किरकोळ मार्केटमध्येही दर कमी होऊ लागले असून १५ मे पर्यंत आवक भरपूर होणार असून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आंबा उपलब्ध होईल, असा अंदाज आंबा व्यापारी व्यक्त करीत आहेत.

परदेशात मागणीपरदेशातून आंब्यासाठी वाढती मागणी आहे. वाशी बाजारात आलेला आंबा आखाती प्रदेशासह अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये जात आहे. प्रत्येक देशाच्या नियमावलीनुसार उष्ण, शीत, बाष्पजल, तसेच विकिरण प्रक्रिया करूनच आंबा हवाईमार्गे निर्यात होत आहे. 

परराज्यातील आंबाकोकणातील हापूससह कर्नाटकमधील हापूस व लालबाग, गुजरातमधून केसर, तोतापुरी, आंध्र प्रदेशमधून बदामी किंवा बैगनपल्ली हेही वाशी बाजारात दाखल झाले आहेत. कोकणातील हापूस १,२०० ते ३,००० रुपये पेटी या दराने विकला जात आहे. केसर १०० ते १५० रुपये, बदामी ७० ते १०० रुपये, तोतापुरी ५० ते ६० रुपये, लालबाग ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकण्यात येत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी कोकणातून ७६७६४ पेट्या व कर्नाटकमधून २४०४८ क्रेटची आवक झाली आहे. एकाच दिवशी १ लाख पेटी व क्रेटची विक्रमी आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस २०० ते ७०० रुपये किलो दराने विकला जात आहे. - संजय पानसरे, संचालक व आंबा व्यापारी, मुंबई बाजार समिती