शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आंबा-काजू उत्पादकांना मिळणार पॅकेजचा डोस

By admin | Updated: April 10, 2015 04:11 IST

अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच

मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच शुक्रवारपर्यंत पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचे झालेले नुकसान आणि फळ प्रक्रियेबाबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर मंत्री खडसे यांनी उत्तर दिले.नवीन किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकण्याआधीच आंबा गळू लागला आहे. यावर नव्याने संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आंबा गुणवत्ता तपासणी केंद्र दापोलीऐवजी रत्नागिरीत करण्याबाबत विचार सुरू असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू बोर्डाचे पुनरुज्जीवन करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, काढणीपश्चात प्रशिक्षण केंद्राची व्याप्ती राज्यभर वाढवण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. फळ प्रक्रियेबाबत सदस्यांनी नवीन प्रकल्प आणावेत, नियमात बसत नसले तरी अशा प्रकल्पांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्याचे आश्वासन खडसे यांनी या वेळी दिले. आंबा आणि काजू उत्पादकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी कोकण दौरा करणास असल्याचे सांगतानाच केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्पादकांचा मेळावा घेण्यात येईल, असे खडसे या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)