शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंचरला हमालाच्या खुनाचा गुन्हा १९ तासांत उलगडला

By admin | Updated: March 7, 2017 01:22 IST

शनिवारी (दि.४) रात्री १० वाजता ३६ वर्षीय हमाल गणेश बबन निघोट यांच्या खुनाचे रहस्य मंचर पोलिसांना अवघ्या १९ तासांत उलगडले.

मंचर : मंचर बस स्थानकानजीक शनिवारी (दि.४) रात्री १० वाजता ३६ वर्षीय हमाल गणेश बबन निघोट यांच्या खुनाचे रहस्य मंचर पोलिसांना अवघ्या १९ तासांत उलगडले. गणेश निघोट याने शिवी दिली म्हणून राग अनावर होऊन तीन तरुण आणि दोन अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून निघोट याचा खून केला. याप्रकरणी तीन तरुणांना मंचर पोलिसांनी अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना पुणे येथील बाल सुधारगृहात रवाना केले आहे. आेंकार अण्णासाहेब बाणखेले (वय २१, रा. मंचर), आदित्य बबन नवले (वय २०, रा. मंचर), पवन सुधीर थोरात (वय १८, रा. मंचर) आणि अल्पवयीन मुले १३ वर्षे ९ महिन्यांचा (रा. मंचर) आणि १५ वर्षे १० महिने, रा. पिंपळगाव खडकी अशा पाच आरोपींवर मंचर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपी मोटारसायकलवरून मंचर बसस्थानकाच्या पाठीमागे निर्जनस्थळावरून जात असताना त्यांना चिंचेच्या झाडाखाली एक व्यक्ती दारू पिऊन झोपल्याचे दिसून आले. जेवण करायचे परंतु पैसे नाही, असे म्हणून त्यांनी दारू प्यायलेल्या इसमाच्या शर्ट आणि पॅन्टचे खिसे तपासले. त्यावेळी दारू प्यायलेला इसम जागा होऊन त्याने शिव्या दिल्या. तसेच, तो उठून बसू लागत असता आदित्य नवले, पवन थोरात यांनी त्या इसमाच्या पाठीवर लाथ मारली. तसेच ओंकार बाणखेले आणि इतर दोघां अल्पवयीन साथीदारांनी दारू प्यायलेल्या इसमाच्या पोटात लाथा मारल्या. त्या वेळी आदित्य नवले म्हणाला की, या बेवड्याला खपवा,असे म्हटल्यावर एका अल्पवयीन आरोपीने बाजूला पडलेला सिमेंटचा ठोकळा इसमाच्या डोक्यात टाकला. त्यावेळी आदित्य नवले यांने, अरे तो जिवंत आहे अजून एकदा दगड टाक, असे म्हणताच पुन्हा त्या अल्पवयीन मुलाने तोच दगड उचलुन त्या इसमाच्या डोक्यात टाकला. पवन थोरात याने पुन्हा दगड उचलून त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकला आणि त्यानंतर आम्ही मोटार सायकलवरून घरी गेल्याची कबुली आरोपींनी दिली. यातील तीन आरोपी ओकार बाणखेले,आदित्य नवले आणि पवन थोरात यांना गुरुवार, दि. ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तर इतर दोन अल्पवयीन मुलांना पुणे येथील बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. (वार्ताहर)