शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनश्रीच्या अपहरणकर्तीचे रेखाचित्र जारी

By admin | Updated: June 26, 2016 13:20 IST

जिल्ह्यातील अकोटच्या जिजामाता नगरातून अपहरण करण्यात आलेल्या मनश्रीची शोधमोहीम सुरूच आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी हिवरखेड येथील दुकानातील सीसी टीव्हीचे फुटेज २५ जून रोजी पोलिसांनी तपासले

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २६ : जिल्ह्यातील अकोटच्या जिजामाता नगरातून अपहरण करण्यात आलेल्या मनश्रीची शोधमोहीम सुरूच आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी हिवरखेड येथील दुकानातील सीसी टीव्हीचे फुटेज २५ जून रोजी पोलिसांनी तपासले; परंतु काही निष्पन्न होऊ शकले नाही. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीच्या आधारे मनश्रीचे अपहरण करणाऱ्या महिलेचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. अकोट येथील सीतला माता मंदिरात सवंगड्यांसेबत खेळताना संतोष लाकडे यांच्या साडेपाच वर्षीय मनश्री या बालिकेचे एका अज्ञात महिलेने चॉकलेट देण्याचे आमिष देऊन २४ जून रोजी अपहरण केले. मनश्री सोबत खेळत असलेल्या सवंगड्यांनी सदर महिलेचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी व नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सोशल साईटवरदेखील मनश्रीचा फोटो व वर्णन व्हायरल करण्यात आले, तसेच पोलिसांनी नाकाबंदीही केली; पण पोलिसांना तिचा थांगपत्ता लागला नाही. दुसरीकडे मनश्रीचे वडीलसुद्धा मध्यप्रदेशात आपल्या मुलीच्या शोधासाठी गेले आहेत. मनश्रीच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असून, तिच्या घरी आईसह सर्वजण चिंंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, मनश्री हरविल्याची सचित्र माहिती सार्वजनिक करण्यात आली असून, मनश्री कुठेही आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान दोन दिवस उलटूनही मनश्रीच्या अपहरणाचे कारण गुलदस्त्यात आहे