शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोधैर्य’ निधी दहा लाख करण्याचा मानस

By admin | Updated: April 1, 2017 03:25 IST

मनोधैर्य योजनेंतर्गत बलात्कार पीडीतेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी तीन लाखांची मदत वाढवून दहा लाख

मुंबई : मनोधैर्य योजनेंतर्गत बलात्कार पीडीतेच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी तीन लाखांची मदत वाढवून दहा लाख करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल, असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषेदत दिले.सध्या बलात्कार पीडित महिलेला तीन लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गोव्यात ही मदत दहा लाख रुपयांची आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पीडित महिलेला मदत वाढवून मिळावी, अशी मागणी काँग्रेस सदस्या हुस्नबानू खलिफे लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली. त्यावरील चर्चेला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून व्यापक योजना लवकरात लवकर आणली जाईल. त्यासाठी विविध विभाग तसेच विधीमंडळातील महिला सदस्यांची समिती नेमून चर्चा करून पीडित महिलेला जास्तीत जास्त मदत मिळावी, यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून पीडित महिलेला तत्काळ २५ हजारांची मदत मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी केली. तसेच महिला आणि बालकल्याण समितीचे अधिकारी रजेवर असतात. त्यामुळे प्रकरण रखडतात. नुसते पैसे दिले की काम संपत नाही. उलट महिलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अधिकारी काम करीत नाही, हा मुद्दा नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला. या सर्व सूचनांचा विचार करून मनोधैर्य योजनेत सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले. २०१३ पासून मनोधैर्य योजना लागू झाल्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने ही मदत देणे कठीण आहे, असे सांगत बलात्कार पीडित महिलेला आधार देण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली. (प्रतिनिधी)१३४ प्रकरणे प्रलंबित बलात्कारपीडित महिलांना देण्यात येणारी आर्थिक मदतीची १३४ प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूण ५९९३ प्रकरणात अर्थसहाय्य मंजूर झाले असून त्यापैकी ४३१८ प्रकरणांमध्ये निधी देण्यात आलेला आहे, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच बजेटमध्ये ४३ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत, असेही त्या म्हणाल्या.